Shah Rukh Khan | KKR Sakal
IPL

Shah Rukh Khan: 'माझे खेळाडू...माझी टीम...' KKR च्या विजयानंतर दोन दिवसांची शाहरुखची भावुक पोस्ट

Shah Rukh Khan: कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर दोन दिवसांनी सहसंघमालक शाहरुख खानने संघासाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे.

Pranali Kodre

KKR Owner Shah Rukh Khan: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा कोलकाता नाईट रायडर्सने जिंकली. रविवारी (26 मे) चेन्नईत झालेल्या अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट्सने पराभूत केले आणि विजेतेपदावर नाव कोरले.

कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) हे तिसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी 2012 आणि 2014 साली गौतम गंभीरच्या नेतृत्वात केकेआरने विजेतेपदाला गवसणी घातली होती.

दरम्यान, केकेआरच्या या तिसऱ्या विजेतेपदाबद्दल संघाचा सहसंघमालक आणि अभिनेता शाहरुख खानने बुधवारी (29 मे) एक स्पेशल पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. तसेच संघातील प्रत्येकाचे त्याने कौतुक केले आहे.

शाहरुख केकेआरच्या जवळपास सर्व सामन्यांसाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता. अंतिम सामन्यावेळीही त्याने स्टेडियममध्ये उपस्थित राहत खेळाडूंचे मनोबल वाढवले होते.

दरम्यान बुधवारी शाहरुखने केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, 'माझ्या खेळाडूसांठी... माझ्या संघासाठी ... माझ्या चॅम्प्ससाठी... तुम्ही माझे आणि केकेआरचे रात्रीचे चमकणारे तारे आहेत. मी खूप गोष्टी करू शकत नाही, तुम्हीही अनेक गोष्टी करू शकत नाही, पण एकत्र मिळून आपण खूप गोष्टी करू शकतो. एकत्रितपणाच्या याच तत्वावर केकेआर उभे आहे.'

'गौतम गंभीरची क्षमता आणि मार्गदर्शन, चंद्रकांत पडिंतांची कळकळ, अभिषेक नायरचे प्रेम, श्रेयस अय्यरचे नेतृत्व, रायन टेन डोशेट, भारत अरुण, कार्ल क्रोव, नॅथन लेमन यांचे समर्पण... या संघात कोणी लहान-मोठे नाही, तर फक्त एकमेकांसाठी सहयोग आणि सन्मान आहे.'

'गौतम गंभीर जसे म्हणतो की जर तुम्ही संघाच्या एका ध्येयाला पाठिंबा देत नसाल, तर संघात विभाजन होते. प्रत्येक खेळाडूने ते समजून घेतले. '

त्याने पुढे लिहिले, संघात सर्वोत्तम खेळाडू आहेत, याचा दाखला विजेतेपदाची ट्रॉफी देत नाही, तर प्रत्येक खेळाडू संघासाठी योग्य असल्याचा पुरावा देते. तुम्ही सर्व खेळाडू स्टार आहात. तुम्हा सर्वांना प्रेम आणि डान्स करणे थांबवू नका.'

'प्रत्येक केकेआरच्या चाहत्यांसाठी आनंदी आणि आभारीही आहे. आशा आहे की जगातील सर्व युवांना यातून हे शिकायला मिळेल की कठीण काळ फारवेळ टिकत नाही. नेहमीच करबो, लडबो, जितबो. 2025 मध्ये पुन्हा स्टेडियममध्ये भेटू.'

अंतिम सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 18.3 षटकात सर्वबाद 113 धावा केल्या. त्यानंतर 114 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कोलकाताने 10.3 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT