Shahrukh Khan PBKS vs RR esakal
IPL

Shahrukh Khan PBKS vs RR : प्रितीच्या पंजाबला अखेर शाहरूखनेच सावरले; राजस्थानला दिले तगडे आव्हान

अनिरुद्ध संकपाळ

Shahrukh Khan PBKS vs RR : आयपीएलच्या 66 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जने सुरूवात खराब करूनही 188 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबच्या शाहरूख खानने शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करत 23 चेंडूत नाबाद 41 धावा ठोकल्या. त्याला सॅम करनने 49 धावा करून चांगली साथ दिली. जितेश शर्मानेही 28 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून नवदीप सैनीने 40 धावात 3 विकेट्स घेतल्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबला पहिल्याच षटकात ट्रेंड बोल्टने धक्का दिला. त्याने सलामीवीर प्रभसिमरन सिंगला 2 धावांवर बाद केले. यानंतर शिखर धवन आणि अथर्व तायडेने डाव सावरत चौथ्या षटकात संघाला 38 धावांपर्यंत पोहचवले. मात्र नवदीप सैनीने अथर्वला 19 धावांवर तर झाम्पाने शिखर धवनला 17 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. पाठोपाठ सैनीने लिम लिव्हिंगस्टोनचा 9 धावांवर त्रिफळा उडवत पंजाबची अवस्था 6.3 षटकात 4 बाद 50 अशी केली.

पंजाबचे चार फलंदाज 50 धावा करतानाच गारद झाल्यानंतर सॅम करन आणि जितेश शर्माने पंजाबचा डाव सावरत पंजाबला 10 षटकात 78 धावांपर्यंत मजल मारून दिली. जितेश शर्माने आक्रमक फलंदाजी करत 28 चेंडूत 44 धावा चोपल्या. त्याने करनसोबत 44 चेंडूत 64 धावांची भागीदारी रचली. पंजाबनेही शतकी मजल मारली होती. मात्र 14 व्या षटकात सैनीने जितेश शर्माचा अडसर दूर केला.

जितेश शर्मा बाद झाला त्यावेळी डावातील 14 षटके झाली होती. त्यानंतर आलेल्या शाहरूख खान आणि सॅम करन यांनी सहाव्या विकेटसाठी पुढच्या 6 षटकात 73 धावांची नाबाद भागीदारी रचली. यामुळे पंजाबने 20 षटकात 5 बाद 187 धावांपर्यंत मजल मारली. सॅम करनने नाबाद 49 तर शाहरूख खानने 23 चेंडूत नाबाद 44 धावा चोपल्या.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT