Mumbai Indians Shane Bond : भारतात सध्या वनडे वर्ल्डकपची धामधूम सुरू आहे. मात्र यादरम्यानच आयपीएल फ्रेंचायजी मुंबई इंडियन्समध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँडने एमआय सोबतचा आपला 9 वर्षाचा प्रवास थांबवत आहे.
शेन बाँड हा त्याच्या पिढीतील एक सर्वोत्तम गोलंदाज होता. त्याने मुंबई इंडियन्सचा कोच म्हणून बाँडने 4 विजेतेपदं मिळवणाऱ्या संघाला मार्गदर्शन केले. आयपीएल सोबतच शेन बाँडने एमआय अमिरातीशी देखील जोडला गेला होता. तो त्या संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. तेथेही संघाने विजेतेपदाला गवसणी घातली.
दरम्यान, मुंबई इंडियन्ससोबतचा आपला प्रवास थांबवत असताना फ्रेंचायजींच्या मालकांचे आभार मानले. तो म्हणाला, 'गेले 9 हंगाम मला मुंबई इंडियन्सचा भाग होता आलं. ही संधी दिल्याबद्दल अंबानी कुटुंबियांचे आभार. मैदान आणि मैदानाबाहेरच्या अनेक आठवणी सोबत आहेत.'
'हा जबरदस्त अनुभव होता. मला अनेक दिग्गज खेळाडू आणि लोकांसोबत काम करता आलं त्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो. मला त्या सर्वांची नक्कीच आठवण येईल. त्या सर्वांना भविष्यासाठी शुभेच्छा. शेवटी एमआय पल्टनचे देखील त्यांच्या पाठिंब्यासाठी आभार.'
मुंबईने प्रसिद्ध पत्रक काढून शेन बाँड फ्रेचायजी सोडत असल्याची माहिती दिली. ते आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हणतात, 'व्यवस्थापन टीम, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ शेन बाँड यांचे आभार मानते. मुंबई इंडियन्सच्या कुटुंबातील सर्वांशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याची कामाप्रतीची नैतिकता छान होती.'
'शेन बाँड 2015 मध्ये बॉलिंग कोच म्हणून मुंबई इंडियन्सशी जोडला गेला होता. त्याने 2015, 2017, 2019 आणि 2020 च्या आयपीएल विजेत्या संघाचे मार्गदर्शन केले. तो फ्रेंचायजीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कोच होता.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.