आयपीएलच्या यंदाच्या हंगामात शार्दुल ठाकूर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून मैदानात उतरणार आहे. याआधी त्याने 2018 आणि 2021 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. 26 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत तो दिल्ली कॅपिटल्ससाठी ट्रम्प कार्ड असणार आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 10.75 कोटी मोजून शार्दुल ठाकूरला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले.
आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी शार्दुल ठाकूरनं एक फोटो शेअर केलाय. त्याने जो फोटो शेअर केल्याय त्याला दिलेले कॅप्शन आणि फोटोतील व्यक्ती खासच आहेत. बॉडीगार्ड्स ठेवणे लोकप्रियतेसाठी गरजेचं आहे, असे लिहित त्याने अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मासोबतचा एक फोटो फोटो शेअर केलाय. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसते.
शार्दुल ठाकूरसह फिरकीपटू अक्षर पटेल, चाइनामॅन कुलदीप यादव, विकेटकीपर-फलंदाज आणि कर्णधार रिषभ पंत आयपीएलच्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघात सामील झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या संघ पहिल्या जेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे. जर त्यांना ऐतिहासिक कामगिरी करायची असेल तर शार्दुल ठाकूरची भूमिका निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.
30 वर्षीय शार्दुल ठाकूरसह दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज एनरिक नॉर्खिया, बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान, युवा जलदगती गोलंदाज कमलेश नागरकोटी, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिशेल मार्श दिल्ली कॅपटिल्सच्या ताफ्यात सहभागी असतील. या गोलंदाजांच्या साथीने शार्दुल ठाकूर कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल 2022 च्या हंगामाची सुरुवात 27 मार्च रोजी मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियमवरुन करणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध ते भिडतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.