Punjab Kings Defeat Gujarat Titans In Last Over Thriller : पंजाबला 18 चेंडूत 41 धावां करायच्या होत्या. पंजाबचे शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, सिकंदर रझा हे रथी महारथी पॅव्हेलियनमधून नखं कुरतडत सामना पाहत होते. क्रिजवर शशांक सिंह अन् आशुतोष शर्मा हे दोन अनकॅप्ट प्लेअर होते. या दोघांची नावं यापूर्वी फारशी कोणी ऐकली नव्हती. त्यात गुजरातचा गुजरातचा हुकमी एक्का मोहित शर्मा 19 वं षटक टाकणार होता. त्यामुळं गुजरातच्या विजयाची फक्त औपचारिकताच शिल्लक होती.
मात्र होत्याचं नव्हतं झालं कुणाच्या ध्यानी मनी नसताना आयपीएल पदार्पण करणाऱ्या आशुतोष शर्मानं अझमतुल्लाच्या एकाच षटकात चार चौकार मारत 16 धावा वसूल केल्या. सामना आता 12 चेंडूत 25 धावा असा आला. गुजरातचा हुकमी एक्का... डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मोहित शर्मा 19 वं षटक टाकण्यासाठी आला. गिलनं देखील मोहितला 19 व्या षटकासाठी राखून ठेवलं अन् आपल्या दर्जेदार कॅप्टन्सीची चुणूक दाखवली.
मात्र मोहितच्या दुसऱ्या चेंडूवर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या आशुतोष शर्मानं षटकार माराला अन् गिलच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यानंतर शशांक सिंह अन् आशुतोषनं डोकं लावत मोहितच्या पुढच्या तीन चेंडूवर 2,2,1 अशा धावा करत हळूहळू टार्गेटजवळ जाण्याचा प्रयत्न केला.
आता सामना 7 चेंडूत 13 धावा असा आला होता. मोहितच्या शेवटच्या चेंडूवर आता मोठं काहीतरी करण्याची गरज होती. झुंजार अर्धशतक ठोकणाऱ्या शशांक सिंहने ती रिस्क घेतली अन् मोहितला षटकार खेचला. या षटकाराबरोबरच गुजरात टायटन्सनं जिंकलेला सामना हरला. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगनं 24 चेंडूत 35, शशांक सिंहनं 29 चेंडूत 61 अन् आशुतोष शर्मानं 17 चेंडूत 31 धावा ठोकल्या. हे तिघेही अनकॅप्ट प्लेअर आहेत. त्यानीं पंजाबच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
पंजाबनं आपली परंपरा कायम राखत तब्बल 6 वेळा 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करून दाखवला. त्यांनी आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा 200 किंवा त्यापेक्षा जास्त धावा चेस करण्याचा पराक्रम केला.
शेवटच्या षटकात विजयासाठी 7 धावांची गरज असताना दर्शन नाळकांडेने आशुतोषला बाद करत गुजरातला आशेचं किरण दाखवलं होतं. मात्र शशांक सिंहनं षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारला अन् गुजरातच्या विजयाच्या आशा मावळल्या. पंजाबनं एक चेंडू अन् 3 विकेट्स राखून विजय मिळवला. गुजरातचा होम ग्राऊंडवर पहिला पराभव झाला.
गुजरातचा कर्णधार शुभमन गिलची 89 धावांची खेळी वाया गेली. खराब सुरूवातीनंतर गिलनं डाव सावरत तब्बल 20 षटकं फलंदाजी केली होती. गुजरात 170 ते 180 धावांमध्ये अडकणार असं वाटत असतानाच गिलला साथ देणाऱ्या साई सुदर्शननं 19 चेंडूत 33 धावा चोपल्या तर सायलेंट किलर राहुल तेवतियाने 8 चेंडूत 23 धावा ठोकत गुजरातला 199 धावांपर्यंत पोहचवलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.