Shashank Singh | Punjab Kings X/PunjabKingsIPL
IPL

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Shashank Singh: पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर शशांक सिंगने शाहरुख खानची आयकॉनिक पोज देत सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

Pranali Kodre

KKR vs PBKS: पंजाब किंग्सने शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 42 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला. पंजाबने ईडन गार्डन्सवर मिळवलेला हा विजय ऐतिहासिक ठरला.

या सामन्यात पंजाबने कोलकाताने दिलेल्या 262 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. धावांचा पाठलाग करताना मिळवलेला हा टी20 क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला.

दरम्यान पंजाबच्या या विजयात शतक करणाऱ्या जॉनी बेअरस्टोबरोबरच प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंगनेही मोलाचा वाटा उचलला. या दोघांनीही आक्रमक अर्धशतकं ठोकली. प्रभसिमरनने बेअरस्टोबरोबर सलामीला 93 धावांची भागीदारी केली, तर नंतर बेअरस्टोने रायली रुसोबरोबर 85 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, रुसो बाद झाल्यानंतरही पंजाबला 39 चेंडूत 84 धावांची गरज होती. अशावेळी बेअरस्टोच्या मदतीला आला शशांक सिंग. त्याने 8 षटकारांची बरसात करत बेअरस्टोबरोबर नाबाद 84 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, त्यांच्या या कामगिरीमुळे पंजाबला ऐतिहासिक विजय मिळवता आला. या विजयानंतर शशांक सिंगने बॉलिवूड स्टार शाहरुख खानची आयकॉनिक पोझही दिली. तो हात पसरवत शाहरुखची आयकॉनिक पोझ देत असतानाचा व्हिडिओही पंजाब किंग्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की शशांक ही पोझ देताना 'थँक यू ईडन गार्डन्स' असं म्हणत आहे. या व्हिडिओला पंजाबने कॅप्शन दिलं आहे की 'शssss, शssss, शशांक.' तसेच या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला शाहरुखने भूमिका निभावलेल्या दिलवाले दुल्हनिया चित्रपटातील गाणेही लावले आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. कारण, शाहरुख हा कोलकाता संघाचा सहसंघमालक आहे. अशात त्याच्याच संघाला हरवल्यानंतर त्याच्यासारखी पोझ शशांकने दिल्याने चाहत्यांकडून या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, या सामन्यात पंजाबकडून बेअरस्टोने 48 चेंडूत 108 धावांची नाबाद खेळी केली, तर शशांकने 28 चेंडूत 68 धावांची नाबाद खेळी केली. तसेच प्रभसिमरनने 20 चेंडूत 54 धावा केल्या. त्यांच्या या खेळीमुळे पंजाबने 262 धावांचे लक्ष्य 18.4 षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केला.

तत्पूर्वी फिल सॉल्ट (75) आणि सुनील नारायण (71) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 261 धावा केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT