Shikhar Dhawan SRH vs PBKS IPL 2023 ESAKAL
IPL

Shikhar Dhawan IPL 2023 : @99! शिखर धवन एकटा भिडला; म्हणून प्रितीच्या पंजाबनं गाठला सन्मानजनक आकडा

अनिरुद्ध संकपाळ

Shikhar Dhawan SRH vs PBKS : सनराईजर्सच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्जची अवस्था 9 बाद 88 धावा अशी केली असताना पंजाबचा कर्णधार शिखर धवन एकटा भिडला. त्याने 66 चेंडू नाबाद 99 धावा ठोकत पंजाबला 20 षटकात 9 बाद 143 धावांपर्यंत पोहचवले. शिखरने आपल्या या खेळीत 12 चौकार आणि 5 षटकार ठोकले. हैदराबादकडून मयांक मार्कंडेयने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याला उमरान मलिक आणि मार्को जेनसेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली.

आयपीएल 2023 च्या 14 व्या सामन्यात नाणेफेक जिंकून सनराईजर्स हैदराबादने गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार एडिन मारक्रमचा हा निर्णय हैदराबादच्या गोलंदाजांनी योग्य ठरवत पंजाब किंग्जला पहिल्या चेंडूपासून छळण्यास सुरूवात केली. मार्को जेनसेन, भुवनेश्वर कुमारने सुरूवातीला पंजाबच्या फलंदाजीला भगदाड पाडल्यानंतर फिरकीपटू मयांक मार्कंडेयने पंजाबला आपल्या फिरकीवर भांगडा करायला लावला.

मयांक मार्कंडेयला उमरान मलिकने देखील चांगली साथ देत पंजाबचे दोन फलंदाज टिपले. मात्र या सगळ्या विपरित परिस्थितीत पंजाबचा कर्णधार शिखर धवन एकटा लढला. त्याने 3 बाद 22 धावा झाल्या असताना सॅम करनसोबत चौथ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी रचली. मात्र करन 22 धावा करून बाद झाल्यानंतर मार्कंडेयने पंजाबची मधली फळी कापून काढायला सुरूवात केली.

मार्कंडेय आणि मलिकने पंजाबची अवस्था 9 बाद 88 धावा अशी केली. मात्र शेवटपर्यंत हार न मानलेल्या शिखर धवनने मोहित राठी या अवघ्या 1 सामना खेळलेल्या 11 व्या क्रमांकाच्या फलंदाजाला हाताशी धरून अर्धशतकी भागीदारी रचली. शिखरने आक्रमक फटकेबाजी करत पंजाब किंग्जला 20 षटकात 143 धावांपर्यंत पोहचवले.

शिखरने 66 चेंडू नाबाद 99 धावा ठोकत पंजाबला 20 षटकात 9 बाद 143 धावांपर्यंत पोहचवले. शिखरने आपल्या या खेळीत 12 चौकार आणि 5 षटकार ठोकले. त्याने शेवटच्या विकेटसाठी मोहित राठीसोबत 30 चेंडूत 55 धावांची भागीदारी रचली. यात मोहितचे फक्त एका धावेचे योगदान होते.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT