Shikhar Dhawan Wicket Sakal
IPL

PBKS vs SRH: भूवीची रणनीती अन् क्लासेनची सुपरफास्ट स्टम्पिंग, असा झाला शिखर धवन 'स्टंप आऊट'; पाहा Video

Shikhar Dhawan Wicket: पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनला खास रणनीती आखून स्टम्पिंग केल्याचं सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सामन्यानंतर सांगितले. शिखरची विकेट कशी गेली पाहा.

Pranali Kodre

Shikhar Dhawan Wicket: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने पंजाब किंग्सविरुद्ध मंगळवारी (9 एप्रिल) 2 धावांनी रोमांचक विजय मिळवला. याच सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर हेन्रिक क्लासेनने पंजाबचा कर्णधार शिखर धवनला केलेल्या यष्टीचीतने सर्वांचे लक्ष वेधले.

दरम्यान, या विकेटसाठी भुवनेश्वर कुमारने रणनीती आखल्याचे त्याने सामन्यानंतर सांगितले. या सामन्यात हैदराबादने पंजाबसमोर 183 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने 3 षटकातच 11 धावांवर 2 विकेट्स गमावल्या होत्या.

त्यानंतर शिखर सॅम करनसह पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, पाचव्या षटकातील चौथा चेंडू ताशी 140 किमी वेगाने भुवनेश्वरने गुड लेंथवर टाकला, ज्यावर शिखरने पुढे येऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.

परंतु, त्याला योग्यप्रकारे शॉट खेळला आला नाही आणि चेंडू यष्टीरक्षक क्लासेनच्या हातात गेला. क्लासेननेही वेळ न दवडता शिखर क्रिजमध्ये परण्यापूर्वीच स्टंपवरील बेल्स उडवले. त्यामुळे शिखरला 16 चेंडूत 14 धावा करून माघारी परतावे लागले.

या विकेटबद्दल सामन्यानंतर भुवनेश्वर कुमारने सांगितले, 'मी क्लासेनला पुढे येण्यास सांगितले होते, कारण शिखर बाहेर येऊन शॉट खेळण्याचे प्रयत्न करत होता आणि मला ऑफ विकेटला गोलंदाजी करून त्याला बाद करण्याचा प्रयत्न करायचा होता. मला वाटते यापूर्वी माझ्या चेंडूवर एखादा फलंदाज जेव्हा मी पुणे वॉरियर्सकडून खेळलो असेल, तेव्हा यष्टीचीत झाला असेल.'

दरम्यान, शिखर बाद झाल्यानंतरही सॅम करन (29) आणि सिकंदर रझा (28) यांनी खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर विकेट्स गमावल्या. पण अखेरीस शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी केलेल्या आक्रमणामुळे पंजाबने विजय मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र २ धावा त्यांना कमी पडल्या.

शशांक 25 चेंडूत 46 धावांवर नाबाद राहिला, तर आशुतोष 15 चेंडूत 33 धावा करून नाबाद राहिला. पंजाबला 20 षटकात 6 बाद 180 धावा करता आल्या.

तत्पुर्वी सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT