Shivam Dube T20 World Cup 2024 sakal
IPL

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Shivam Dube T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या चेन्नई सुपर किंग्जच्या आशा धुळीला मिळाल्या.

Kiran Mahanavar

Shivam Dube T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या चेन्नई सुपर किंग्जच्या आशा धुळीला मिळाल्या. आयपीएल 2024 च्या 68 व्या सामन्यात शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाला 27 धावांनी पराभव पत्करावा लागला. हा नॉकआउट सामना जिंकून आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

जेव्हा चेन्नईला शिवम दुबेच्या चांगल्या कामगिरीची गरज होती तेव्हा तो फ्लॉप ठरला. दुबेने 15 चेंडूत सात धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 46.66 होता. डावखुऱ्या फलंदाजाला एकही चौकार मारता आला नाही.

शिवम दुबेने या हंगामात सीएसकेसाठी सर्व लीग सामने खेळले, परंतु 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याची टीम इंडियात निवड झाल्यानंतर त्याची बॅट शांत झाली. टीम इंडियात निवड होण्यापूर्वी दुबे सीएसकेसाठी खूप धावा करत होता, पण त्यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म पूर्णपणे घसरला आहे.

वर्ल्ड कप संघात निवड झाल्यानंतर शिवम दुबेची कामगिरी

शिवम दुबेने आयपीएल 2024 मध्ये एकूण 14 सामने खेळले आणि या सामन्यांमध्ये त्याने 162.29 च्या सरासरीने 396 धावा केल्या. या सामन्यांमध्ये शिवमची सरासरी 36.00 होती. या हंगामात त्याने 244 चेंडूंचा सामना करताना या धावा केल्या आणि तीन वेळा नाबाद राहिला, तर त्याने आपल्या बॅटने 3 अर्धशतकेही केली आणि दोनदा शून्यावर बाद झाला. यादरम्यान दुबेने 28 चौकार मारले आणि 28 षटकारही लगावले.

पण टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर त्याची कामगिरी खुपत खराब राहिली आहे. आयपीएल 2024 मध्ये 9 लीग सामने खेळल्यानंतर, त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली, परंतु पुढील 5 सामन्यांमध्ये त्याने खूप निराश केले. या 5 सामन्यांमध्ये त्याने केवळ 46 धावा केल्या आणि त्याची सरासरी 9.2 होती, जी अत्यंत खराब आहे. या काळात त्याचा स्ट्राइक रेटही घसरला जो 112.2 होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT