Shubhman Gill IPl 2023 Virat Kohli RCB Defeat Sister Shahneel Gill : आयपीएलमध्ये गुजरात टायटन आणि बंगळुरु यांच्यातील सामन्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. विराट कोहलीच्या शतकानंतर गुजरातचा पराभव निश्चित मानलं जात होतं. मात्र शुभमन गिलनं जी खेळी केली त्यामुळे विराट कोहलीचा आनंद फार काळ टिकला नाही. यासगळ्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले आहे.
नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरुन आपला राग शुभमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ करत व्यक्त केला आहे. काहींनी अतिशय खालच्या पातळीवर जावून तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. चाहत्यांना बंगळुरुचा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. तोंडाशी आलेला घास शुभमननं हिरावून घेतल्यानं त्यांना अजुनही तो पराभव पचवता आलेला नाही. अशातच सोशल मीडियावरील प्रतिक्रियांनी त्यांचे लक्ष वेधले गेले आहे.
Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
कित्येकांनी बंगळुरुच्या पराभवाला शुभमन गिलला जबाबदार धरले आहे. त्यात भरीस भर म्हणून अनेकांनी त्याच्या बहिणीला शाहनील गिलला अपशब्द वापरले आहेत. बऱ्याचजणांनी नेटकऱ्यांना असे करणे चुकीचे असून त्यात शुभमनचे शतक त्यात तिच्या बहिणीची काय चुक आहे असा प्रश्न विचारत आपण खिलाडूवृत्तीचा स्विकार करायला हवा. पराभव झाल्यानंतर तो अशा प्रकारे व्यक्त करणे चुकीचे आहे. असे म्हटले आहे.
मॅचविषयी सांगायचे झाल्यास आयपीएलच्या त्या शेवटच्या साखळी सामन्यात गुजरातनं बाजी मारली आहे. त्यांच्या विजयामुळे मुंबईचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित झाला आहे. काही झालं तरी मुंबईला हैद्राबादच्या विरोधात विजय मिळवणे अनिवार्य होते. त्यांनी तो मिळवला. मात्र त्यांना चिंता ही बंगळुरुची होती. त्यांचा रनरेट अधिक होता. त्यानंतर जे घडलं त्यामुळे सोशल मीडियावर बंगळुरुच्या चाहत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या मीम्सबाबत राग व्यक्त केला आहे. हार जीत हा खेळाचा भाग आहे मात्र त्यामुळे कुणाच्या वैयक्तिक जीवनाबाबत अशाप्रकारे सामाजिक माध्यमातून प्रतिक्रिया देणे, शिवीगाळ करणे ही खिलाडूवृत्ती नक्कीच नाही. अशा प्रकारे काही जणांनी ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. शुभमन गिलच्या खेळीनं बंगळुरुचं जेतेपदाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगल्याचे दिसून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.