Shubman Gill Claim Spot In T20I World Cup India Squad ESAKAL
IPL

Shubman Gill GT vs PBKS : प्रिन्स ऑफ अहमदाबाद गिलची तगडी खेळी अन् निवडसमितीचं वाढलं टेन्शन

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill GT vs PBKS IPL 2024 : आयपीएलचे सामने जसजसे पुढे सरकत आहेत तसतसे निवडसमितीचं काम अवघड होत आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावरच बीसीसीआयची निवडसमिती अमेरिका अन् वेस्ट इंडीज येथे होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे.

आज आयपीएलच्या 17 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने पंजाब किंग्जविरूद्ध 48 चेंडूत 89 धावांची नाबाद खेळी केली. गिलने अहमदाबादची टॉप ऑर्डर ढासळली असताना शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करत गुजरातला 200 धावांच्या जवळ पोहचवले. या खेळीनंतर त्याने संघातील सलामीवीराच्या जागेसाठी आपली दावेदारी सादर केली आहे. त्यामुळे निवडसमितीसह यशस्वी जैयस्वालचे देखील टेन्शन वाढलं आहे.

जेव्हापासून यशस्वी जयस्वालने टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे तेव्हापासून शुभमन गिलचं नाव टी 20 मधून थोडं बाजूला पडलं. मात्र आयपीएलच्या 17 व्या हंगामात गिलनं पुन्हा एकदा आपल्या नावाची चर्चा घडवून आणायला सुरूवात केली आहे. आता टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालसोबत तिसरा सलामीवीर म्हणून कोणाची निवड करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गिल होणार दुसरा सलामीवीर?

रोहित शर्मा टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे तो सलामीवीर म्हणून देखील फिक्स झाला आहे. आता त्याच्या जोडीला यशस्वी जयस्वाल येणार की शुभमन गिल येणार या दोघांना विराट कोहली टफ कॉम्पिटिशन देणार का? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

विराट कोहली जरी आरसीबीकडून सलामीला येत असला तरी तो भारतीय संघाकडून तिसऱ्या क्रमांकावरच खेळतोय. त्यामुळे गिल अन् जयस्वाल यांच्यातच थेट स्पर्धा असणार आहे.

आकडेवारी पाहिली तर यशस्वी जयस्वाल हा टी 20 क्रिकेटमध्ये दर पाच डावांनंतर अर्धशतक ठोकतोय. तर शुभमन गिल दर सात डावांनंतर अर्धशतक ठोकतोय. जयस्वालने 16 सामन्यात 502 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 33.46 असून त्याने 161.93 च्या सरासरीने धावा केल्या. यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

दुसरीकडे शुभमन गिलने 14 सामन्यात 335 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 25.76 इतकी आहे तर स्ट्राईक रेट हे 147.57 इतके आहे. त्याने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलं आहे.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT