IPL

Shubman Gill GT vs MI : मुंबईचं पॅक अप! शुभमननेच प्ले ऑफमध्ये आणलं अन् बाहेर काढलं, मोहितनेच्याही पंजाचा हातभार

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill Mohit Sharma GT vs MI : गुजरात टायटन्सने लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात आरसीबीला पराभूत केलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सने प्ले ऑफचं तोंड पाहिलं. याच सर्व श्रेय 104 धावांची शथकी खेळी करणाऱ्या शुभमन गिलला गेलं. मात्र याच मुंबईला प्ले ऑफची दारं उघडून देणाऱ्या शुभमन गिलने मुंबईचे क्वालिफायर 2 मध्ये पॅक अप केले. यावेळीही त्याने 129 धावांची धडाकेबाज शतकी खेळी केली.

या शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 234 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईकडून तिलक वर्माने धडाकेबाज खेळी करत 14 चेंडूत 43 धावा चोपल्या. तर सूर्यकुमार यादवनेही 61 धावांची खेळी केली. मुंबईची धावगती जबरदस्त होती. मात्र गुजरातने मोक्याच्या क्षणी मुंबईच्या विकेट्स घेत त्यांचा डाव 171 धावात गुंडाळला. गुजरातकडून मोहित शर्माने 2.2 षटकात 5 विकेट्स घेत भेदक मारा केला. त्याने महत्वपूर्ण सूर्यकुमारची विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सचा नेहमीचा सलामीवीर इशान किशनला दुखापत झाल्याने त्याच्या ऐवजी नेहाल वधेरा सलामीला आला. मात्र मोहम्म शमीने त्याला पहिल्याच षटकात 4 धावांवर बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला.

सामन्याच्या दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्याचा चेंडू कॅमरून ग्रीनच्या हाताला लागल्याने त्याला दुखापत झाली. WTC फायनल तोंडावर असताना दुखापत झाल्याने कॅमरून ग्रीन हिटायर्ड हर्ट झाला.

कॅमरून ग्रीन बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने चौकार मारत आपल्या इनिंगची सुरूवात केली. मात्र पुढच्याच षटकात रोहित शर्मा मोहम्मद शमीची शिकार झाला. तो 8 धावा करून माघारी परतला.

ग्रीन दुखापतग्रस्त होऊन बाहेर गेला. रोहित बाद झाला आता मुंबईच्या हातून सामना गेला असे सर्वांना वाटले होते. मात्र सूर्यकुमारसोबत फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने गुजरातला पॉवर प्लेमध्ये आपला दम दाखवून दिला. त्याने मोहम्मद शमी टाकत असलेल्या 5 व्या षटकात सलग चार चौकार मारत 24 धावा चोपल्या. त्याने याच षटकात मुंबईचे अर्धशतक धावफलकावर लावले. तिलक वर्माने 14 चेंडूत 43 धावा चोपल्या. मात्र पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवत मुंबईला मोठा धक्का दिला. मात्र वर्माच्या या धडाकेबाज फलंदाजीमुळे मुंबईने 6 षटकात 72 धावांपर्यंत मजल मारली होती.

तिलक वर्मा 14 चेंडूत 43 धावा करून बाद झाला असला तरी त्याने संघासाठी मोठे काम केले. वर्मानंतर रिटायर्ड हर्ट झालेला कॅमरून ग्रीन मैदानावर परतला. त्याने सूर्यकुमारच्या साथीने दमदार भागीदारी रचत मुंबईला 10 षटकात 110 धावांपर्यंत पोहचवले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 52 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र जोशुआ लिटलने ग्रीनला 30 धावा बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला.

ग्रीन बाद झाल्यानतंर सूर्यकुमार यादवने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने आपली धावगची वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने 15 व्या षटकातच दीडशतकी मजल मारून दिली. मात्र 38 चेंडूत 61 धावांची खेळी करणाऱ्या सूर्याला मोहित शर्माने चकवले आणि त्याचा त्रिफळा उडवला. मुंबईसाठी हा मोठा धक्का होता.

या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच मोहितने विष्णू विनोदलाही बाद केले. पाठोपाठ टीम डेव्हिड देखील अवघ्या 2 धावांची भर घालून परतला. जॉर्डननेही त्याच्या पावलावर पाऊल ठेवले. मुंबईची अवस्था 16 षटकात 8 बाद 168 धावा अशी झाली. अखेर मोहित शर्माने 10 धावात 5 विकेट्स घेत मुंबईचा डाव 171 धावात गुंडाळला आणि सामना 62 धावांनी जिंकला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT