GT vs RR IPL 2023 esakal
IPL

GT vs RR : गिल - मिलरच्या अर्धशतकाच्या आड आला संदीप शर्मा! गुजरातचे 200 चे स्वप्नही भंगले

अनिरुद्ध संकपाळ

GT vs RR IPL 2023 : राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला त्यांच्याच होम ग्राऊंडवर 177 धावात रोखले. गुजरातकडून शुभमन गिलने 45 तर डेव्हिड मिलरने 46 धावांची खेळी केली. मात्र या दोघांनाही संदीप शर्माने बाद करत त्यांना अर्धशतक पूर्ण करू दिले नाही. गुजरातकडून हार्दिक पांड्याने 28 तर अभिनव मनोहरने 27 धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून चहल, बोल्ट आणि झाम्पाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

बोल्टने वृद्धीमान साहाला पहिल्याच षटकात बाद केल्यानंतर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र 20 धावांवर साई सुदर्शन धावबाद झाला अन् गुजरातला पॉवर प्लेमध्ये दुसरा धक्का बसला.

या दोन धक्क्यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने आक्रमक फटकेबाजी करत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूने शुभमन गिल अँकर इनिंग खेळत होता. मात्र या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी जोडल्यावर युझवेंद्र चहलने 19 चेंडूत 28 धावा करणाऱ्या हार्दिकची शिकार केली.

हार्दिक बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर आणि शुभमन गिलने गुजरातला 16 व्या षटकात 121 धावांपर्यंत पोहचवले. मात्र संदीप शर्माने शुभमन गिलची 34 चेंडूत केलेली 45 धावांची खेळी संपवली.

गिल बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर यांनी गुजरातला 150 च्या पार पोहचवले. अभिनव मनोहर आक्रमक फटकेबाजी करत होता. डेव्हिड मिलरने देखील आपला गिअर बदलला. मात्र 13 चेंडूत 27 धावा करणाऱ्या मनोहरला झाम्पाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवाला. यानंतर मिलरने गुजरातला 175 धावांपर्यंत पोहचवले.

मात्र संदीप शर्माने त्याला 46 धावांवर बाद करत त्याचे अर्धशतक होऊ दिले नाही. संदीप शर्माने गिलला देखील अर्धशतक पूर्ण करू दिले नाही. अखेर राजस्थानने गुजरातला 177 धावावर रोखण्यात यश मिळवले. संदीप शर्माने 4 षटकात 25 धावा देत 2 बळी टिपले.

(Sports Latets News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT