Sourav Ganguly Big Statement about IPL 2022 venues  esakal
IPL

'जर कोरोना रूग्णसंख्या वाढली नाही तरच आयपीएल...'

सौरभ गांगुलीचे IPL 2022 च्या ठिकाणाबाबत मोठे सुतोवाच

अनिरुद्ध संकपाळ

बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरभ गांगुलीने आयपीएलचा (Indian Premier League) 15 वा हंगाम कोठे होणार याबाबत सुतोवाच केले आहे. सौरभ गांगुलीने (Sourav Ganguly) सांगितले की, भारतातील कोरोना रूग्णसंख्या जर आकाशाला भिडली नाही तर आयपीएलचा 15 (IPL 2022) वा हंगाम भारतातच होईल. याचबरोबर सौरभ गांगुलीने यंदाच्या आयपीएलमधील साखळी सामने हे मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) खेळवण्याचा मानस असेल असे सांगितले. (Sourav Ganguly Big Statement about IPL 2022 venues)

सौरभ गांगुली म्हणाला की, 'जर भारतात कोरोनाची रूग्णसंख्या आकाशाला भिडली नाही तर आयपीएलचा यंदाचा हंगाम हा भारतातच होईल. आयपीएलच्या ठिकाणांबाबत (IPL 2022 Venue) बोलायचं झालं तर आम्ही सामने महाराष्ट्रात आयोजित करण्याचा विचार करत आहोत. आम्ही साखळी फेरीतील सामने मुंबई पुण्यात खेळवण्याची योजना आखत आहोत. आम्ही बाद फेरीतील सामने कोठे खेळवायचे हे नंतर ठरवणार आहोत.'

बीसीसीआयने आयपीएल 2022 चा हंगाम कधी सुरू होणार याची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी मार्चच्या शेवटी आयपीएल सुरू करणार असल्याचे सांगितले होते. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नव्या फ्रेंचायजींचा समावेश करण्यात आला आहे. लखनौ सुपरजायंट आणि अहमदाबाद असे दोन नवे संघ आयपीएलमध्ये सामिल होणार आहेत. त्यामुळे आयपीएलमधील संघांची संख्या 8 वरून 10 वर पोहचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT