Kaviya Maran Sakal
IPL

SRH vs LSG : सनरायझर्सचा फ्लॉप शो; 'चंद्रा'चा चेहरा पडला!

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022, SRH vs LSG : आयपीएलच्या 15 व्या हंगामातही सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)अजून डिसचार्ज मोडमध्ये आहे. गत हंगामात तळाला राहिलेल्या सनरायझर्स हैदराबादचा संघ यंदाच्या हंगामातही सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसत आहे. मागील हंगामात हैदराबाद संघाला 14 पैकी केवळ 3 सामन्यात विजय मिळलाला होता. आता पहिल्या दोन सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर स्टँडमध्ये संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या संघ मालकीण काव्या मारनचा (Kaviya Maran) चेहरा पडल्याचे चित्र पहायला मिळाले. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरलही होताना दिसत आहेत.

लखनौ विरुद्धच्या लढतीत हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्ण. घेतला होता. वॉशिंग्टनने सुंदर गोलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पण लोकेश राहुल आणि दीपक हुड्डा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनौनं त्यांच्यासमोर 170 धावांच लक्ष्य उभे केले. या धावांचा पाठलाग करताना संघ अपयशी ठरला. राहुल त्रिपाठीच्या 44 धावा वगळता अन्य कोणत्याही खेळाडूला नावाला साजेसा खेळ करता आला नाही.

सनरायझर्स हैदराबादच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर संघाची मालकीण काव्या मारन सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. संघाने तिला पुन्हा एकदा निराश केल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटत आहेत. काव्या मारन प्रत्येक सामन्याला संघाला प्रोत्साहन देण्यास स्टेडियमवर हजेरी लावताना दिसते. गत हंगामात युएईमध्ये रंगलेल्या हाफ सीझनमध्ये ती संघासोबत होती. पण संघ काही चांगली कामगिरी करताना दिसत नाही. आताही त्यांची तिच अवस्था आहे. त्यामुळे सूर्य उगवेना आणि चंद्राचा चेहरा (काव्या मारन) पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Chh.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT