Sunil Gavaskar old Video Virat Kohli Strike Rate Controversy esakal
IPL

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar old Video Virat Kohli Strike Rate Controversy : आयपीएलच्या 17 व्या हंगामात समालोचन करताना सुनिल गावसकर यांनी विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर टीका केली होती. यानंतर वाद वाढत गेला. विराट कोहलीने एका सामन्यानंतर बाहेरील आवाजाचा माझ्यावर काही परिणाम होत नाही असं वक्तव्य केलं. त्याचं हे वक्तव्य सुनिल गावसकरांना उत्तर असल्यांच बोललं जात आहे. विराटने मात्र कोणाचं नाव घेतलं नव्हतं.

यानंतर 4 मे ला आरसीबी आणि गुजरात विरूद्धच्या सामन्यात ही मुलाखत सातत्यानं दाखवली गेली. त्यानंतर गावसकर नाराज झाले आणि त्यांनी विराट कोहली अन् स्टार स्पोर्ट्सवर टीका केली. गावसकर यांनी मी विराटचा स्ट्राईक रेट 118 होता त्यावेळी हे वक्तव्य केलं होत आणि स्टार स्पोर्ट्सने ही मुलाखत सारखी दाखवून त्यांच्या समालोचकांचा अपमान केला आहे अशी टीका केली.

यानंतर विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवरून नवा वाद निर्माण झालेला नाही. मात्र सोशल मीडियावर सुनिल गावसकर यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. 1975 मधील वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात सुनिल गावसकर 174 चेंडूत 36 धावा केल्या होत्या. गावसकरांवर यानंतर खूप टीका झाली होती. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 60 षटकात 334 धावा केल्या होत्या. भारतीय संघ 60 षटकात 3 विकेट्स गमावून 132 धावाच करू शकली.

गावसकर यांनी डावाची सुरूवात केली अन् ते नॉट आऊट राहिले होते. या खेळीनंतर एका मुलाखतीत गावसकरांना त्यांच्या या संथ खेळीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी, काहींना मी संथ खेळी केली असं वाटलं असेल मात्र कदाचित आमच्या गोलंदाजांनी जास्तच धावा दिल्या असतील. असं उत्तर गावसकरांनी दिलं होतं.

इंग्लंडने हा सामना 202 धावांनी जिंकला होता. गावसकरांनी 174 चेंडू खेळून एकच चौकार मारला होता. त्यांचे स्ट्राईक रेट हे 20.68 इतके होते. आता या मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT