Sunil Gavaskar on taking MS Dhoni's autograph : आयपीएल 2023 च्या साखळी फेरीतील शेवटच्या चेन्नई सुपर किंग्जला घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह संपूर्ण संघाने चेपॉक स्टेडियमवर चेन्नईच्या चाहत्यांसमोर लॅप ऑफ ऑनर केला.
या सामन्याच्या दरम्यान, महान सुनील गावसकर आणि धोनी यांचा समावेश असलेल्या एका घटनेने संपूर्ण जगाची मने जिंकली. खरं तर सामन्यानंतर माही चाहत्यांमध्ये गेला आणि त्यांना CSK ची जर्सी भेट म्हणून दिली. त्यावेळी गावसकर धावतच धोनीकडे आले आणि त्याला ऑटोग्राफ मागितला. यानंतर धोनीने गावसकरला त्याच्या शर्टवर ऑटोग्राफ दिला आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली. आता गावसकर यांनी या संपूर्ण घटनेमागची कहाणी सांगितली आहे.
गावसकर यांनी खुलासा केला की ते यासाठी तयार नव्हते आणि क्षणात सर्व निर्णय घेतले गेले. धोनीचे कौतुक करताना सुनील गावसकर म्हणाले, “त्याने स्वत:ला ज्या पद्धतीने हाताळले ते खरोखरच अद्भुत आहे. सामना संपल्यानंतर सीएसके मैदानावर फेरफटका मारणार आहे हे कळताच मी लगेच पेन घेण्यास सांगितले आणि धोनीकडे पोहोचलो. कारण मला या खास क्षणाचा भाग व्हायचे होते. मला मार्कर पेन देणार्या कॅमेरामनचा मी आभारी आहे. मी धोनीला ऑटोग्राफसाठी विनंती केली. धोनीने ते मान्य केले. माझ्यासाठीही तो खूप भावनिक क्षण होता.
आपला मुद्दा पुढे नेत सुनील गावसकर म्हणाले की, कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकाची ट्रॉफी उचलली आणि महेंद्रसिंग धोनीने 2011 विश्वचषकात षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला हे माझ्यासाठी खूप खास क्षण होते. मला मरण्यापूर्वी ते बघायचे आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सुनील गावसकर गेल्या तीन दशकांपासून समालोचनाच्या माध्यमातून क्रिकेटशी जोडले गेले आहेत. यादरम्यान त्याने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनीसारखे फलंदाज पदार्पणापासूनच दिग्गज बनताना पाहिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.