Sunil Gavaskar on Hardik Pandya IPL 2024 MI vs CSK sakal
IPL

IPL 2024 MI vs CSK : हार्दिक पांड्यानी केली सर्वात खराब बॉलिंग? माजी दिग्गजाने कर्णधारवर केली जोरदार टीका

Sunil Gavaskar on Hardik Pandya : चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.

Kiran Mahanavar

Sunil Gavaskar on Hardik Pandya IPL 2024 MI vs CSK : चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात हार्दिकची कामगिरीही काही खास नव्हती. शेवटच्या षटकात एमएस धोनीने चेन्नईसाठी 500 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आणि हार्दिक पांड्याच्या षटकात फक्त 4 चेंडूत 20 धावा ठोकल्या. यादरम्यान भारताच्या माजी दिग्गज सुनील गावसकरने हार्दिकची खराब कामगिरी आणि कर्णधारपदावर संताप व्यक्त केला आहे.

सुनील गावसकर म्हणाले की, “कदाचित बऱ्याच दिवसांनी मी अशी वाईट गोलंदाजी पाहिली आहे. ज्या चेंडूंवर धोनी षटकार मारणार होता तेच चेंडू हार्दिकने टाकले. एक षटकार सुद्धा ठीक आहे, पण पुढच्या चेंडूवर तुम्ही लेन्थ बॉल टाकला, तरीही तुम्हाला माहित आहे की फलंदाज लेन्थ बॉलची वाट पाहत आहे. ही पूर्णपणे सामान्य गोलंदाजी होती. आणि सामान्य कर्णधार.

मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 4 चेंडूत सलग तीन षटकार आणि 2 धावा करत 20 धावा केल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबईने 6 विकेट्सवर 186 धावा केल्या आणि चेन्नईने 20 धावांनी सामना जिंकला. महेंद्रसिंग धोनीने या 20 धावा केल्या नसत्या तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी चेन्नई सुपर किंग्ज संघाला 180 धावांच्या पुढे नेले पण महेंद्रसिंग धोनीच्या षटकारामुळे धावसंख्या 200 च्या पुढे गेली.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, चेन्नईने 20 षटकात 6 गडी गमावून 206 धावा केल्या. कर्णधार गायकवाडने 69 तर शिवम दुबेने 66 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 6 गडी गमावून केवळ 186 धावा करू शकला. रोहित शर्माने 63 चेंडूत नाबाद 105 धावा केल्या. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Health Tips :  शरीरातील बॅड कोलोस्टेरॉल कमी करायचा आयुर्वेदीक फंडा, भाकरी करण्याआधी इतकच करा

'वक्फ बोर्डाच्या नावाखाली राज्यातील शांतता भंग केल्यास कठोर कारवाई करणार'; गृहमंत्र्यांचा कडक इशारा

बॉक्सर Mike Tyson अन् जॅक पॉलवर कोटींचा वर्षाव; जाणून घ्या संपत्ती किती ?

Swiggy-Zomato: स्विगी, झोमॅटो आणि झेप्टोबाबत देशातील बड्या उद्योगपतीचा इशारा, म्हणाले, भारत हा...

SCROLL FOR NEXT