Sunil Gavaskar on Rohit Sharma sakal
IPL

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

मुंबई इंडियन्स संघाचे आव्हान संपलेले होतेच, पण अखेरच्या सामन्यात रोहित शर्माच्या बॅटमधून धावा होणे हे भारतीय संघासाठी सुचिन्ह आहे....

Kiran Mahanavar

Sunil Gavaskar on Rohit Sharma : मुंबई इंडियन्स संघाचे आव्हान संपलेले होतेच, पण अखेरच्या सामन्यात रोहित शर्माच्या बॅटमधून धावा होणे हे भारतीय संघासाठी सुचिन्ह आहे, असे मत भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.

या आयपीएलमध्ये पहिल्या टप्प्यात चेन्नईविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माने नाबाद १०५ धावांची खेळी केली. त्यानंतर रोहितचा फॉर्म हरपला होता. सातपैकी चार सामन्यांत तो एकेरी धावांवर बाद झाला होता. त्यानंतर शुक्रवारी लखनौविरुद्ध त्याने ३८ चेंडूंत ६८ धावांची खेळी केली. त्यात त्याने तीन शानदार षटकार मारले.

मुंबई इंडियन्स प्ले-ऑफसाठी पात्र ठरणार नाही, हे अगोदरच स्पष्ट झाले होते, पण अखेरच्या सामन्यात तरी रोहित शर्माकडून धावा होणे हे भारतीय संघासाठी महत्त्वाचे होते. कारण पुढच्या १५ दिवसांत ट्वेन्टी-२० विश्वकरंडक सुरू होणार आहे आणि कर्णधार रोहित शर्मावर भारताची मोठी मदार असणार आहे, असे गावसकर यांनी सांगितले.

विश्वकरंडक स्पर्धेत रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली तर भारतीय संघाला लय मिळेल आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी सातत्य राखले तर द्विशतकी धावा भारताला सहज करता येतील, असे गावसकर यांचे म्हणणे आहे.

१ जूनपासून विश्वकरंडक स्पर्धा सुरू होत आहे. मात्र भारताचा पहिला सामना ५ जूनला होणार आहे. त्याअगोदर बांगलादेशविरुद्ध सराव सामना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT