Hardik Pandya Sunil Gavaskar  esakal
IPL

Hardik Pandya Sunil Gavaskar : हार्दिक कॅप्टन्सीचा वारसा ठेवून... गावसकरांनी पांड्याला तर धोनीच्याच पंक्तीत बसवले

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Sunil Gavaskar : आज (दि. 29) आयपीएल 2023 मधील डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स गतविजेच्या गुजरात टायटन्सशी भिडत आहे. तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनराईजर्स हैदराबाद एकमेकांविरूद्ध दंड थोपटतील. गेल्यावेळी केकेआर आणि गुजरात भिडले होते त्यावेळी रिंकू सिंहने यश दयालच्या एकाच षटकात 29 धावा ठोकत विजयाचा चमत्कार घडवला होता. त्यामुळे हार्दिक पांड्या आजच्या सामन्यात कोणती रणनिती वापरणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

हार्दिक पांड्याने गुजरातचे नेतृत्व उत्तम पद्धतीने केले आहे. यंदाच्या हंगामात अनेक अटीतटीच्या सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला आहे. तरी देखील हार्दिकने आपल्या कामगिरी आणि नेतृत्वाने एक उदाहरण सर्वांसमोर ठेवले. सुनिल गावसकरांनी देखील हार्दिक पांड्याच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करत त्याची तुलना थेट धोनीशी केली.

स्टार स्पोट्सशी बोलताना गावसकर म्हणाले की, 'अनेकवेळा कर्णधार आपले व्यक्तीमत्व संघावर देखील थोपण्याचा प्रयत्न करतात. कर्णधाराचे व्यक्तीमत्व आणि संघाचे व्यक्तीमत्व नेहमी वेगवेगळे हवे. हार्दिक हा आपले व्यक्तीमत्व संघावर थोपत नाही.'

'गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून तो हेच करतोय. कर्णधार म्हणून हा एक वारसा आहे. हार्दिक आयपीएलमध्ये एक चांगला वारसा जपतोय. कर्णधार म्हणून त्याचा दृष्टीकोण हा धोनीसारखाच आहे. हार्दिकने त्याच्या माजी भारतीय कर्णधाराकडून चांगले गुण घेतले आहेत.'

आजच्या सामन्यात गुजरात नितीश राणाच्या नेतृत्वातील केकेआरशी त्यांच्याच मैदानात भिडणार आहे. केकेआरने नुकतेच रॉयल चॅलेंजर बेंगलोरला त्यांच्याच घरात मात दिली. त्यामुळे केकेआरचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. आरसीबीविरूद्ध केकेआरने आपल्या चार पराभवाची मालिका खंडित केली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT