Virat Kohli - Gautam Gambhir | Sunil Gavaskar | RCB vs KKR | IPL 2024 Sakal
IPL

Virat - Gambhir: '...त्यांना ऑस्करच दिला पाहिजे,' विराट-गंभीरच्या पॅचअपवर गावसकरांची कमेंट

Sunil Gavaskar: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या भेटीवर रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Virat Kohli - Gautam Gambhir Patch up: शुक्रवारी (29 मार्च) इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) स्पर्धेत झालेल्या 10 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला.

दरम्यान, एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यावेळी एक घटना सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. ती घटना म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली यांची झालेली भेट. यावर रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

खरंतर यापूर्वी विराच आणि गंभीर यांच्यात आयपीएलवेळी अनेकदा वाद झाले आहेत. त्यातही गेल्यावर्षी गंभीर लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक असताना बेंगळुरूविरद्धच्या सामन्यातनंतर त्याचे विराटबरोबर कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली होती.

त्याचमुळे आता गंभीर लखनौ संघाबरोबरचा प्रवास थांबवून कोलकाता संघात आल्यानंतर कोलकाता आणि बेंगळुरू संघात होणाऱ्या सामन्यात त्याचे आणि विराट यांचे संबंध कसे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण अखेर या दिल्लीकरांनी समेट केली.

दरम्यान, जेव्हा त्यांच्या भेटीचे दृश्य ब्रॉडकास्टटरकडून दाखवण्यात येत होते, त्यावेळी रवी शास्त्री आणि सुनील गावसकर समालोचन करत होते. समालोचनावेळी शास्त्री म्हणाले, 'ही घटना फेअरप्ले पुरस्कारासाठी पात्र आहे.' त्यानंतर गावसकर गमतीने म्हणाले, 'फक्त फेअरप्ले नाही, तर त्यांना ऑस्कर द्यायला हवा.'

दरम्यान, विराट आणि गंभीर यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरच व्हायरल होत आहे.

बेंगळुरूचा पराभव

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास या सामन्यात बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 182 धावा केल्या होत्या. बेंगळुरूकडून विराटने 59 चेंडूत सर्वाधिक 83 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले.

त्याच्याव्यतिरिक्त कॅमेरॉन ग्रीनने 33 धावा, ग्लेन मॅक्सवेलने 28 धावा आणि दिनेश कार्तिकने 20 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून हर्षित राणा आणि आंद्र रसेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कोलकाताने 16.5 षटकातच 3 विकेट्स गमावत 186 धावा करत पूर्ण केला.

कोलकाताकडून वेंकटेश अय्यरने 30 चेंडूत 50 धावांची खेळी केली, तर सुनील नारायणने 22 चेंडूत 47 धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने 24 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. बेंगळुरूकडून यश दयाल, मयंक डागर आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

Meesho: आता टी-शर्टवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो... मीशोवर नेटकऱ्यांचा संताप! कंपनीनं काय दिलं स्पष्टीकरण?

Kartiki Yatra : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू राहणार

अखेर भुलभुलैय्या 3 ने सिंघम अगेनला टाकलं मागे; बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कार्तिकच ठरला अजयपेक्षा सरस

Nashik Vidhan Sabha Election : बंडखोरांच्या तलवारी म्यान; बहुतांश बहुरंगी लढती

SCROLL FOR NEXT