Sunil Gavaskar IPL 2024 esakal
IPL

Sunil Gavaskar IPL 2024 : आयपीएल सोडून देशाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना शिक्षा करा! गावसकरांनी BCCI कडे केली मागणी

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar IPL 2024 : भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनिल गावसकर हे इंग्लंड क्रिकेट बोर्डावर जाम भडकले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी 20 वर्ल्डकप खेळणाऱ्या आपल्या खेळाडूंना आयपीएल सोडून लवकर मायदेशी परतण्यास सांगितले आहे. गावसकर यांनी आयपीएलचा हंगाम लवकर सोडणाऱ्या खेळाडूंवर आणि त्यांच्या क्रिकेट बोर्डावर दंडात्मक कारवाई करण्याचा बीसीसीआयला सल्ला दिला.

सुनिल गावसकर मिड डे मधील कॉलममध्ये लिहितात की, 'मी देशाकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचे समर्थन करतो. मात्र जे खेळाडू फ्रेंचायजींना संपूर्ण हगामासाठी त्यांच्या उपलब्धतेबाबत आश्वस्त करतात. मात्र आता ते माघार घेत आहेत. यामुळे फ्रेंचायजीचं नुकसान होत आहे. फ्रेंचायजी हे त्यांना एका हंगामासाठी एवढे पैसे देतात की तेवढे पैसे ते देशाकडून काही हंगाम खेळले तरी मिळवू शकत नाहीत.'

ते पुढे म्हणाले की, 'फ्रेंचायजीने अशा खेळाडूंच्या फीमधून मोठी रक्कम कापून घ्यावी. याचबरोबर क्रिकेट बोर्डांना त्यांचे 10 टक्के कमिशन देखील देण्यात येऊ नये. जर बोर्ड आश्वस्त करून माघार घेत असतील तर त्यांना देखील दंडीत केलं पाहिजे. खरं सांगायचं तर क्रिकेट बोर्डांना प्रत्येक खेळाडूमागे 10 टक्के कमिशन हे फक्त आयपीएलमध्येच दिले जाते. जगात इतर कोठेही असं केलं जात नाही. बीसीसीआयच्या या उदारपणाचे कोणी आभार मानतं का? नाही नक्कीच नाही.'

काही आठवड्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जे खेळाडू टी 20 वर्ल्डकप संघात निवडले गेले आहेत त्यांना 22 मे पूर्वी मायदेशात दाखल होण्यास सांगितले होते. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात टी 20 मालिका होणार आहे. त्यासाठी या सर्व खेळाडूंना मायदेशात परत बोलवण्यात आलं आहे.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT