Sunrisers Hyderabad Defeat Gujarat Titans  ESAKAL
IPL

GT vs SRH : गुजरातची विजयी घोडदौड हैदराबादच्या नवाबांनी थांबवली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गुजरात टायटन्सचा विजयी रथ अखेर सनराईजर्स हैदराबादने रोखला. हैदराबादने गुजराचे 163 धावांचे आव्हान 2 गड्यांच्या मोबदल्यात पार करत हंगामातील आपला दुसरा विजय मिळवला. हैदराबादकडून कर्णधार केन विल्यमसनने 54 धावांची तर अभिषेक शर्माने 42 धावांची खेळी केली. त्यानंतर निकोलस पूरनने 18 चेंडूत 34 धावा चोपून सामना जिंकून दिला.

गुजरात टायटन्सच्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी दमदार सुरुवात करून दिली. विल्यमसन सावध तर अभिषेक शर्माने आक्रमक पवित्र्यात फलंदाजी केली. त्यांनी पॉवर प्लेमध्ये फार जोखीम घेण्याऐवजी भागीदारी रचण्यावर भर दिला. या दोघांनी 64 धावांची सलामी दिली.

मात्र त्यानंतर धावाचा वेग वाढवण्याच्या नादात अभिषेक शर्मा 42 धावा करून बाद झाला. त्याला राशिद खानने बाद केले. यानंतर केन विल्यमसनने डावाची सूत्रे हातात घेतली. त्याला राहुल त्रिपाठी देखील आक्रमक फटके मारून चांगली साथ देत होता. मात्र त्रिपाठीला क्रँम्प येऊ लागल्याने त्याने मैदान सोडले. त्याच्या जागी आलेल्या निकोलस पूरनने त्रिपाठीची कमतरता दूर करत आक्रमक फटकेबाजी केली. दरम्यान, केन विल्यमसनने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र अर्धशतकानंतर बाद झाला. त्याला हार्दिक पांड्याने 54 धावांवर बाद केले. त्यानंतर निकोलस पूरनने 18 चेंडूत 34 धावा चोपून सामना 19.1 षटकात जिंकून दिला.

तत्पूर्वी, आयपीएलच्या 21 व्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरूवात खराब झाली. पॉवर प्लेमध्येच त्यांच्या दोन विकेट पडल्या. गेल्या सामन्यात 96 धावांची खेळी करणाऱ्या शुभमन गिलला भुवनेश्वरने 7 धावांवर बाद केले. त्यानंतर नटराजनने साई सुदर्शनचा (11) अडसर दूर केला.

यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने डाव सावरण्यास सुरूवात केली. मात्र मॅथ्यू वेडने 19 चेंडूत 19 धावा करून त्याची साथ सोडली. त्यानंतर हार्दिक संघाला शतकाजवळ घेऊन गेला. मात्र डेव्हिड मिलर पुन्हा एकदा मोठी खेळी अपयशी ठरला. त्याला मार्को जेनसेनने 12 धावांवर बाद केले. गुजरातची 4 बाद 104 धावा अशी अवस्था झाली असताना हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहरने डाव सावरला.

मनोहरने 21 चेंडूत 35 धावांची आक्रमक खेळी करत गुजरातला 150 चा टप्पा पार करून दिला. मात्र 19 व्या षटकात तो बाद झाला. राहुल तेवतिया देखील 6 धावांची भर घालून परतला दरम्यान, हार्दिक पांड्याने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला 162 धावांपर्यंत पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT