Sunrisers Hyderabad Defeat Lucknow Super Giants Mumbai Indians have been eliminated Play Off Race : सनराईजर्स हैदराबादनं आज लखनौ सुपर जायंट्सचा तब्बल 10 विकेट्सनी पराभव करत प्ले ऑफच्या दिशने कूच केली. हैदराबादने लखनौचे 166 धावांचे आव्हान 9.4 षटकात एकही विकेट न गमावता पार केलं.
अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड यांनी दमदार फलंदाजी करत 167 धावांची नाबाद सलामी दिली. हेडने 30 चेंडूत 89 धावांची तर अभिषेक शर्माने 28 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी केली. हैदराबादच्या या दमदार विजयानंतर मुंबईला मोठा धक्का बसला. त्यांची प्ले ऑफच्या रेसमधून अधिकृतरित्या एक्झिट झाली आहे.
दरम्यान, सनराईजर्स हैदाराबादनं 10 षटकाच्या आतच 167 धावा ठोकून अनेक विक्रम पायदळी तुडवले आहेत. ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी देखील अनेक विक्रमांना गवसणी घातली. हैदराबाद ही आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात 10 षटकात सर्वाधिक धावा करणारी टीम ठरली आहे. हैदराबादने आजच्या सामन्यात अनेक विक्रम केले आहेत.
आयपीएल इतिहासात 10 षटकात सर्वाधिक धावा करणारे संघ
सनराईजर्स हैदराबाद - 2024 - लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध 9.4 षटकात बिनबाद 167 धावा.
सनराईजर्स हैदराबाद - 2024 - दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध 4 बाद 158 धावा
सनराईजर्स हैदराबाद - 2024 - मुंबई इंडियन्सविरूद्ध 2 बाद 148 धावा
सनराईजर्स हैदराबाद - 2024 - मुंबई इंडियन्सविरूद्ध 2 बाद 141 धावा
सर्वात जास्त बॉल राखून विजय (100 धावांच्या पुढचे टार्गेट)
सनराईजर्स हैदराबाद - 2024 - लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध 62 चेंडू राखून
दिल्ली कॅपिटल्स - 2022 - पंजाब किंग्ज विरूद्ध 57 चेंडू शिल्लक ठेवून 116 धाव चेस
डेक्कन चार्जर्स - 2008 - मुंबई इंडियन्सविरूद्ध 155 धावांचे टार्गेट 48 चेंडू राखून पार
16 चेंडू - अभिषेक शर्मा vs MI हैदराबाद 2024
16 चेंडू - ट्रॅव्हिस हेड vs DC दिल्ली 2024
16 चेंडू - ट्रॅव्हिस हेड vs LSG हैदराबाद 2024
18 चेंडू - ट्रॅव्हिस हेड vs MI हैदराबाद 2024
IPL पॉवर प्लेमध्ये सर्वाधिकवेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज
डेव्हिड वॉर्नर - 6
ट्रॅविस हेड - 4 (सर्व खेळी IPL 2024 मध्ये)
सुनिल नारायण - 3
ख्रिस गेल - 3
30 चेंडू - हेड - अभिषेक शर्मा, दिल्ली विरूद्ध 2024
34 चेंडू - हेड - अभिषेक शर्मा, लखनौविरूद्ध 2024
36 चेंडू - हरभजन - सचित, पंजाब किंग्जविरूद्ध 2015
36 चेंडू - ख्रिस लिन - नारायण, आरसीबीविरूद्ध 2017
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.