Sunrisers Hyderabad Make Highest Runs In IPL History : सनराईजर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. त्यांनी आरसीबीच्या 263 धावांचे रेकॉर्ड मोडले. सनराईजर्स हैदराबादने 20 षटकात 3 बाद 277 धावा ठोकल्या. हैदराबादने 34 चेंडूत सर्वाधिक 80 धावा केल्या. तर ट्रॅविस हेड (62 धावा) आणि अभिषेक शर्माने (64 धावा) यांनी हैदराबादला दमदार सुरूवात करून दिली होती. अभिषेक शर्माने हैदराबादकडून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. त्याने 16 चेंडूत अर्धशतक ठोकले. तर हेडने 18 चेंडूत अर्धशतक ठोकले.
2024 मध्ये SRH 277/3 वि MI
2013 मध्ये RCB 263/5 वि PWI
2023 मध्ये LSG 256/5 वि PBKS
2016 मध्ये RCB 248/3 वि GL
2010 मध्ये CSK 246/5 वि RR
2018 मध्ये KKR 245/6 वि KXIP
2008 मध्ये CSK 240/5 वि KXIP
2023 मध्ये CSK 235/4 वि KKR
हैदराबादने आज मुंबई इंडियन्सची यथेच्छ धुलाई केली. पहिल्यांदा ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्माने धडाकेबाज अर्धशतक ठोकत हैदरदाबादला 11 षटकात 161 धावा करून दिल्या. हेडने 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानंतर 22 मिनिटांनी अभिषेक शर्माने 16 चेंडूत अर्धशतक ठोकत हैदराबादकडून सर्वात वेगवान आयपीएल अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
हेड 24 चेंडूत 62 तर अभिषेकने 23 चेंडूत 63 धावा ठोकल्या. यानंतर हेन्री क्लासेनने 24 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याने एडिन मार्करमसोबत 9 षटकात 116 धावांची भागीदारी रचली. हेन्री क्लासेनने 34 चेंडूत नाबाद 80 धावा ठोकल्या तर एडिनने 28 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.