KKR vs SRH Pat Cummins  esakal
IPL

KKR vs SRH : कॅप्टन कमिन्स ठरला व्हिलन? तगडी फलंदाजी तरी हैदराबादचा IPL Final मध्ये लाजिरवाणा विक्रम

KKR vs SRH IPL 2024 Final :

अनिरुद्ध संकपाळ

SRH Register A Lowest totals in IPL finals : आयपीएलच्या 17 व्या हंगामाची फायनल रंजक होईल असं वाटलं होतं. ग्रुप स्टेजमधील दोन तगडे संघ अंतिम सामन्यात पोहचले होते. हा सामना हैदराबादची बॅटिंग अन् केकेआरची बॉलिंग असा होईल असे अपेक्षित होते.

मात्र नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादला केकेआरने 113 धावात गुंडाळले. एक वेळ अशी होती की हैदराबाद शंभरी तरी पार करणारा का अशी शंका वाटत होती. मात्र कर्णधार कमिन्सने 24 धावा करून संघाची लाज वाचवली.

सनराईजर्स हैदराबाद 113 धावात गारद झाल्यानं आयपीएल फायनलमधील एक लाजिरवाणा विक्रम त्यांच्या नावर झाला. ते आता आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात कमी धावात बाद होणारा संघ ठरले आहेत. यापूर्वी हा विक्रम सीएसकेच्या नावावर होता.

आयपीएल फायनलमध्ये सर्वात कमी धावसंंख्या उभारणारे संघ

  • सर्वबाद 113 धावा - 2024 - हैदराबाद (विरूद्ध संघ केकेआर)

  • 9 बाद 125 धावा - 2013 - चेन्नई (विरूद्ध संघ मुंबई इंडियन्स)

  • 6 बाद 128 धावा - 2017 - रायजिंग पुणे सुपर जायंट्स (विरूद्ध संघ मुंबई इंडियन्स)

  • 8 बाद 129 धावा - 2017 - मुंबई इंडियन्स (विरूद्ध संघ रायजिंग पुणे सुपर जायंट्स)

नाणेफेक जिंकून चेन्नईमध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पॅट कमिन्सच्या चांगलाच अंगलट आला. नाणेफेकीवेळीच अय्यरने जर त्यानं टॉस जिंकला असता तर गोलंदाजीच केली असती असं सांगितलं. त्यानं खेळपट्टीचा चांगला अभ्यस केला असल्याचा दावा केला. अन् त्यानं हा दावा पहिल्या इनिंगमध्ये हैदराबादला 113 धावात गुंडाळून खरा करून दाखवला.

हैदराबादची निच्चांकी धावसंख्या

  • 96 धावा - मुंबई इंडियन्स विरूद्ध 2019

  • 113 धावा - मुंबई इंडियन्स विरूद्ध 2015

  • 113 धावा - केकेआर विरूद्ध 2024

  • 114 धावा - पंजाब किंग्ज विरूद्ध 2020

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

ACMC Solar Holding : एसीएमसी सोलर होल्डिंग्सच्या आयपीओकडून गुंतवणुकदारांची निराशा, शेअर्स 13% डिस्काउंटवर लिस्ट...

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

SCROLL FOR NEXT