Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Live Score ESAKAL
IPL

SRH vs CSK IPL 2024 : माक्ररमचे अर्धशतक तर अभिषेकचा तडाखा; हैदराबादचा चेन्नईवर सहज विजय

अनिरुद्ध संकपाळ

Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings :

सनराईजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा 6 विकेट्सनी पराभव करत हंगामातील आपला दुसरा विजय साजरा केला. सीएसकेचे 165 धावांचे आव्हान हैदराबादने 18.1 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत आयपीएलमधील आपला दुसरा विजय साजरा केला. एडिम माक्ररमने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर अभिषेक शर्माने 12 चेंडूत 37 धावा चोपल्या. चेन्नईकडून मोईन अलीने 2 विकेट्स घेत हैदराबादला थोडं टेन्शन दिलं होतं. मात्र क्लासेन आणि नितीश रेड्डीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 165 धावा केल्या. संथ सुरूवातीनंतर शिवम दुबेने 24 चेंडूत 45 धावा ठोकत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. अजिंक्य रहाणेने देखील 30 चेंडूत 35 धावा केल्या. मात्र त्याला स्ट्राईक रेट चांगला ठेवण्यात अपयश आलं. जडेजाने स्लॉग ओव्हरमध्ये 31 धावा करत सीएसकेला 165 धावांपर्यंत पोहचवलं. हैदराबादकडून भुवनेश्वर, नटराजन, कमिन्स, शाहबाज अन् उनाडकटने प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या.

SRH vs CSK Live Score Update : माक्ररमचे अर्धशतक तर अभिषेकचा तडाखा; हैदराबादचा चेन्नईवर सहज विजय

चेन्नईने 165 धावांचे आव्हान हैदराबादने 18.1 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत आयपीएलमधील आपला दुसरा विजय साजरा केला. एडिम माक्ररमने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर अभिषेक शर्माने 12 चेंडूत 37 धावा चोपल्या.

SRH vs CSK Live Score Update : सीएसकेने हैदराबादसमोर ठेवलं 166 धावांचं आव्हान

चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात 5 बाद 165 धावा केल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक 45 तर अजिंक्य रहाणेने 35 धावा केल्या. हैदराबादकडून सर्व गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली.

जडेजाची फटकेबाजी 

रविंद्र जडेजा आणि डॅरेल मिचेल यांनी फटकेबाजी करत चेन्नईला 18 व्या षटकात 150 धावांचा टप्पा पार करून दिला.

SRH vs CSK Live Score Update : शिवम दुबे, रहाणेची आक्रमक खेळी मात्र हैदराबादचं पुनरागमन

शिवम दुबेने 25 चेंडूत 45 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने 30 चेंडूत 35 धावांची खेळी केली. मात्र या दोघांनाही मोक्याच्य क्षणी बाद करत उनाडकट आणि कमिन्सने हैदराबाला कमबॅक करून दिलं.

कर्णधाराने देखील सोडली साथ 

शाहबाज अहमदने ऋतुराज गायकवाडला 26 धावांवर बाद करत चेन्नईला दुसरा धक्का दिला. यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी सीएसकेला 8 षटकात 65 धावांपर्यंत मजल मारून दिली.

SRH vs CSK Live Score Update : भुवनेश्वरने दिला पहिला धक्का; चेन्नईची सावध सुरूवात

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर रचिन रविंद्रला भुवनेश्वर कुमारने 12 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर चेन्नईने सावध फलंदाजी करत 5 षटकात 1 बाद 33 धावा केल्या.

सीएसकेने संघात केले तीन बदल 

चेन्नई सुपर किंग्जने देखील हैदराबादविरूद्धच्या सामन्यात तीन बदल केले आहेत. त्यांनी मोईन अली, तिक्षाणा आणि मुकेश चौधरी यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलं आहे.

SRH vs CSK Live Score Update : हैदराबादच्या पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकली; भारताच्या स्टार फलंदाजाला दाखवला बाहेरचा रस्ता?

सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कमिन्सने आपल्या संघात दोन बदल केले असून मयांक अग्रवाल आजारी असल्याने खेळणार नाहीये. तर टी. नटराजनला संघात पुन्हा स्थान मिळालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT