Ruturaj Gaikwad - Shivam Dube Sakal
IPL

T20 World Cup: 'आगरकर भाई त्याला टीम इंडियात निवड...', रैनाने CSK च्या कोणत्या खेळाडूसाठी केली बॅटिंग

Suresh Raina Post: जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठी येत्या काही दिवसात भारतीय संघाची निवड होऊ शकते, अशात सुरेश रैनाने या संघात चेन्नई सुपर किंग्सच्या एका खेळाडूला स्थान देण्याची विनंती निवड समिती अध्यक्षांकडे केली आहे.

Pranali Kodre

Team India: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या 39 व्या सामन्यात मंगळवारी (23 एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाला 6 विकेट्सने पराभूत केले. असे असले तरी या सामन्यात चेन्नईकडून शिवम दुबेने अर्धशतक करत मोठा विक्रम केला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई संघाकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडसह 104 धावांची भागीदारी करताना शिवमने 27 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांसह 66 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने चेन्नईकडून 1000 धावा पूर्ण केल्या.

खरंतर दुबे आयपीएल 2024 स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने 8 सामन्यांत 3 अर्धशतकांसह 169.95 च्या स्ट्राईक रेटने 311 धावा केल्या आहेत. त्याने या दरम्यान 23 चौकार आणि 22 षटकार मारले आहेत.

एकूणच त्याचा फॉर्म पाहाता अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याला आगामी टी२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान देण्याबद्दल सुचवले आहे. अशातच आता भारताचा आणि चेन्नईचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनानेही थेट निवड समितीच्या अध्यक्षांकडेच त्याची निवड करण्याची विनंती केली आहे.

रैनाने दुबेचे कौतुक करणारी एक्सवर (ट्वीटर) पोस्ट केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की 'शिवम दुबेसाठी वर्ल्डकप लोडिंग. आगरकर भाई त्यांची कृपया निवड कर.'

भारतीय संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष अजित अगरकवर असून त्याला रैनाने या पोस्टमध्ये टॅग केले आहे. दरम्यान जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी 1 मेपर्यंत प्राथमिक संघ घोषित करायची अंतिम तारीख आहे.

त्यामुळे एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात भारतीय संघाची निवड होऊ शकते. यासाठी आगरकरच्या अध्यक्षतेखाली निवड समिती 27 किंवा 28 एप्रिलला बैठक घेणार असल्याची शक्यता आहे.

लखनौने जिंकला सामना

चेन्नईकडून मंगळवारी झालेल्या सामन्यात दुबेव्यतिरिक्त ऋतुराजने 60 चेंडूत 104 धावांची खेळी केली. त्यामुळे चेन्नईने 20 षटकात 4 बाद 210 धावा केल्या. त्यानंतर लखनौने 211 धावांचे आव्हान 19.3 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केले. लखनौकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक 124 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

SCROLL FOR NEXT