Suryakumar Yadav IPL 2023 ESAKAL
IPL

Suryakumar Yadav : सूर्याला झालंय तरी काय... आधी सोपा झेल सोडला नंतर भोपळा फोडण्यातही चुकला

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav IPL 2023 : भारताचा 360 डिग्री खेळाडू सूर्यकुमार यादवला यंदाच्या हंगामात लागलेलं ग्रहण दिवसेंदिवस जास्तच काळ लांबत चालले आहे. आज दिल्ली कॅपिटल्सविरूद्धचा सामना सूर्यासाठी सुरूवातीपासूनच फारसा चांगला गेला नाही. सूर्यकुमार यादव हा तसा सेफ फिल्डर म्हणून ओळखला जातो. मात्र आज त्याने सोपा झेल सोडला. याचबरोबर झेल सुटल्याने त्याच्या डोळ्याच्या जवळ दुखापत देखील झाली.

बर सूर्याचा बॅड टाईम इथंच थांबला नाही. मुंबईने दिल्लीचे 173 धावांचे आव्हान पार करताना आक्रमक सुरूवात केली. त्यानंतर मधल्या फेजमध्ये मुंबईची धावगती थोडी मंदावली. ज्यावेळी मुंबईला 30 चेंडूत विजयासाठी 50 धावांची गरज होती त्यावेळी तिलक वर्माने मुकेश कुमारच्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार मारत 16 धावा वसूल केल्या. मात्र याच षटकात तिलक वर्मा तिसरा षटकार मारण्याच्या नादात बाद झाला.

तिलक वर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजी करण्यासाठी आला. मुकेश कुमारने चेंडू लेग स्टम्पवर टाकत सूर्याला आयतं कोलीत दिलं होतं. मात्र तिथेही सूर्या चुकला. त्याला चेंडू सीमापार धाडता आला नाही. तो डीप स्क्वेअर लेगला झेल देऊन पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता माघारी फिरला. या पाठोपाठच्या दोन विकेट्सनी मुंबईसाठी सामना फसला. त्यातच रोहित शर्माही 45 चेंडूत 65 धावा करून बाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT