IPL 2023 Suryakumar Yadav : आयपीएलच्या 16व्या हंगामातील 16व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. मंगळवारी राजधानीच्या घरच्या मैदानावर असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या विजयासह मुंबईचे खाते पॉइंट टेबलमध्ये उघडले आहे. त्याने शेवटच्या चेंडूपर्यंत सहा विकेट्स राखून सामना जिंकला. मुंबईविरुद्धचा पराभव हा दिल्लीचा मोसमातील चौथा पराभव आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या डावात अक्षर पटेलने शानदार अर्धशतक झळकावले, मात्र डावाच्या 17व्या षटकात मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव अक्षरचा झेल टिपताना जखमी झाला.
या सामन्यात स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही क्षेत्रात फ्लॉप ठरला आहे. प्रथम त्याने क्षेत्ररक्षणात एक नाही तर दोन झेल सोडले, ज्यामुळे कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापला. पहिली घटना डावाच्या 15व्या षटकात घडली, जेव्हा अक्षर पटेलने हवाई शॉट खेळला पण सूर्याने संधी गमावली.
यानंतर दुसरी घटना 17व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हा पण अक्षरचा झेल होता आणि तोही सूर्याने सोडला. चेंडू त्याच्या दोन हातांमध्ये जाऊन त्याच्या तोंडाला आणि डोळ्याला लागला. यासोबतच तो जखमी झाला. चेंडू सूर्याच्या डोळ्याजवळ लागला आणि थोडक्यात वाचला. दुखापतीनंतर सूर्याला मैदानाबाहेर जावे आले. त्याच्या जागी रमणदीपला पर्याय म्हणून मैदानात आला.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली होती, पण तो फलंदाजीत अपयशी ठरला. यानंतर तो एकदिवसीय मालिकेत सलग तीन वेळा गोल्डन-डकचा बळी ठरला. त्याचवेळी आयपीएल 2023 मध्येही सूर्यकुमारची बॅट शांत दिसत आहे. सूर्याने दोन सामन्यांत एकूण 16 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत त्याच्या अशा दुखापतीनंतर मुंबई संघ अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.