IPL 2024 Rohit Sharma  sakal
IPL

IPL 2024 Rohit Sharma : मुंबई संघातील भवितव्याबाबत रोहितचा सस्पेंस ;प्रशिक्षक बाऊचर यांनी विचारलेला प्रश्न खुबीने टोलावला

नेतृत्वगुणांबरोबर अतिशय चाणाक्षपणे उत्तरे देण्याची खासियत असलेल्या रोहित शर्माने मुंबई इंडियन्समधील आपल्या भवितव्याबाबत सस्पेंस कायम ठेवला. मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्या प्रश्नावर रोहितने गुगली चेंडू ठरेल असे उत्तर दिले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नेतृत्वगुणांबरोबर अतिशय चाणाक्षपणे उत्तरे देण्याची खासियत असलेल्या रोहित शर्माने मुंबई इंडियन्समधील आपल्या भवितव्याबाबत सस्पेंस कायम ठेवला. मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्या प्रश्नावर रोहितने गुगली चेंडू ठरेल असे उत्तर दिले. यंदाच्या मोसमातला मुंबई इंडियन्सचा अखेरचा सामना झाला. त्यातही पराभव झाला असला, तरी रोहित शर्माने आक्रमक अर्धशतक केले आणि या मोसमात तोच मुंबई संघाकडून सर्वाधिक ४१७ धावा करणारा फलंदाज ठरला. यात त्याने एक शतक आणि चार अर्धशतके केली.

रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून दूर करण्यात प्रशिक्षक मार्क बाऊचर यांचा मोठा हात असल्याचे बोलण्यात येत आहे. लखनौविरुद्धचा शुक्रवारचा अखेरचा सामना संपल्यानंतर बाऊचर यांनी रोहितकडून त्याच्या भवितव्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु रोहितने त्यांना दाद लागू दिली नाही.

खरे सांगायचे तर माझे रोहितबरोबर फार संभाषण होत नव्हते. शुक्रवारचा सामना संपल्यानंतर यंदाच्या मोसमातील कामगिरीचे विश्लेषण करायला मी त्याला सांगितले. तसेच त्याला आता पुढे काय, असाही प्रश्न केला. यावर त्याने ट्वेन्टी-२० विश्वकरंडक, असे उत्तर दिले, असे बाऊचर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. वास्तविक बाऊचर यांनी रोहितच्या मुंबई इंडियन्समधील भवितव्याबाबत विचारायचे होते.

मुंबई इंडियन्स संघाला आपल्या कर्णधारपदी पाच अजिंक्यपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली आणि हार्दिक पंड्याकडे नेतृत्व देण्यात आले. यावर रोहितने जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली नसली, तरी त्याची देहबोली सर्व काही स्पष्ट करणारी होती. त्यातच मुंबई संघाचे चाहते मुंबईचा राजा... रोहित शर्मा असा घोष प्रत्येक सामन्यात करत होते. त्याच वेळी हार्दिकची हुर्यो उडवली जात होती.

मुंबई इंडियन्ससाठी हा मोसम संपला आणि त्यांना दहा संघात दहाव्या क्रमांकावर रहावे लागले. लखनौविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेस बाऊचर स्वतः आले आणि त्यांनी संघाच्या सुमार कामगिरीचे विश्लेषण केले. रोहितबाबत बोलताना ते म्हणाले, तो त्याच्या मनाचा राजा आहे. पुढील वर्षी सर्वच खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. त्यात काय घडेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे जसे घडत जाईल, ते पाहत राहायचे. रोहितसाठी हा मोसम दोन टप्प्यांत होता. तो नेटमध्ये कठोर मेहनत तर घेत होताच. चेन्नईविरुद्ध त्याने मुंबईत झळकावलेले शतक अप्रतिम होते.

आमच्या संघात चांगले खेळाडू होते. चांगले यश मिळेल, अशीही अपेक्षा होती; परंतु ट्वेन्टी-२० प्रकारात अनिश्चितता अधिक असल्याने काहीच सांगू शकत नाही. दुर्दैवाने आम्हाला यशापेक्षा अपयशच जास्त मिळाले, असे बाऊचर म्हणाले. मुंबईने १४ साखळी सामन्यात १० सामने गमावले. तळाच्या स्थानावर राहण्याची नामुष्की त्यांच्यावर तीन वर्षांत दुसऱ्यांदा ओढावली.

सलामीला अतिशय आक्रमक फलंदाजी करण्याचा मंत्र रोहित शर्मा अवलंबत आहे. एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतही त्याचे हे रूप सर्वांनी पाहिले आहे. यंदा आयपीएलमध्ये काही सामन्यात तो स्वस्तात बाद झाला; पण मोसमाची सांगता त्याने शानदार अर्धशतकाने केली, असेही बाऊचर म्हणाले.

क्षमतेनुसार कामगिरी नाही

आमचा संघ बलवान होता; परंतु क्षमतेनुसार कामगिरी करता आली नाही, हे बाऊचर यांनी मान्य केले. गोलंदाजीत ताकद कमी झाली. मोसम सुरू होण्याच्या अगोदरच जेसन बेहनँडॉफ हा महत्त्वाचा गोलंदाज दुखापतग्रस्त झाला, मधुशंकाही दुखापतीमुळे खेळू शकला नाही, त्याचाही फटका बसला. आता पुढच्या लिलावात हुकमी गोलंदाज निवडण्यावर भर द्यावा लागणार आहे, असे बाऊचर यांनी सांगितले.

रोहितला मानवंदना

रोहित शर्मा कदाचित पुढच्या मोसमात मुंबई संघाचा भाग नसेल याची जाणीव मुंबई संघाच्या चाहत्यांनाही झालेली आहे. शुक्रवारचा सामना हा मुंबई इंडियन्स संघाकडून त्याचा अखेरचा सामना असल्याचे बोलले जात होते. अर्धशतक करून तो ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना सर्व प्रेक्षकांनी उभे राहून त्याला टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली. जणू काही निरोप दिल्यासारखे ते दृश्‍य होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT