T Natarajan Maiden 19th Over Sunrisers Hyderabad Defeat Delhi Capitals : आज आयपीएलमध्ये काय झालं...? हैदराबादनं तिसऱ्यांदा 250 पेक्षा जास्त धावा केल्या! अमक्यानं इतक्याच चेंडूत इतक्या साऱ्या धावा केल्या! याचं तीनशेच्या स्ट्राईक रेटनं चोपलं तर त्यानं साडेतीनशेच्या स्ट्राईक रेटनं चोपलं! तुम्हालाही ऐकून ऐकून वैताग आला असेल ना...?
मग आता काहीतरी नवीन ऐकुयात! दिल्ली - हैदराबाद सामन्यात तब्बल 465 धावा झाल्या. त्या काय आयपीएलमध्ये रोजच होत आहेत. कधी 450 तर कधी 500 धावा ठरलेल्या आहेत. मात्र आजच्या सामन्यात धावांचा पाऊस पाडणं हे कॉमन होतं. हैदराबादकडून ट्रॅविस हेडनं हा पाऊस पाडला. तर इकडं दिल्लीकडून जॅक फ्रेजरनं 18 चेंडूत 65 धावा चोपून पॉवर प्लेमध्ये जवळपास 100 धावा केल्या.
मात्र आजच्या सामन्यातचे ही दोघंही हिरो नाही. तो एक डायलॉग आहे ना अपने गली मैं तो कुत्ता भी शेर होता हैं! पाटा खेळपट्टी, इम्पॅक्ट प्लेअरच कुशन, स्विंग, सीम न होणारा चेंडू असं सर्व काही आपल्या बाजूला घेत कोणीही धावांचे डोंगर उभारेल. मात्र ना खेळपट्टीचा लाभ ना नियमांची साथ असं असताना टिच्चून गोलंदाजी करणारे गोलंदाज आज हिरो ठरलेत.
हैदराबादची पॉवर प्लेमधील राक्षसी फलंदाजी पाहिल्यावर वाटलं की क्रिकेटमध्ये बॉलरचं काम आहे तरी काय? ते मंगोलियात बुझकाशी नावाचा एक खेळ खेळला जातो. ढोबळमानानं यात एक बकरा किंवा त्याचं मास उचलून तो विरोधी संघाच्या गोलपोस्टमध्ये टाकायचं असतो. सध्याच्या टी 20 क्रिकेटमधला बॉलर हा या बुझकाशीमधील बकऱ्यासारखा झाला आहे.
कोणीही येतं अन् बॉलरला मारून जातं अशी अवस्था झालेल्या या टी 20 जगतात आपल्या गोलंदाजीच्या कैशल्यानं सामना जिंकून द्यायचा म्हणजे महाकठिण काम! मात्र हे काम सनराईजर्स हैदराबादसाठी तीन गोलंदाजांनी केलं. पॉवर प्लेमध्ये आधी पृथ्वी शॉ आणि नंतर जॅक गोलंदाजांच्या मागं हात धुवून लागले होते.
मात्र भुवनेश्वर कुमारनं दिल्लीच्या या फलंदाजांना रोखण्याचं काम केलं. भुवीनं डेव्हिड वॉर्नरला बाद केलं. त्यानंतर फ्रेजर आणि अभिषेक पोरेल यांनी हैदराबादच्या दुसऱ्या गोलंदाजांची देखील पिसं काढली होती. मात्र मार्कंडेनं या दोघांचा बळी घेत हैदराबादची सामन्यावर पकड निर्माण केली.
जरी फ्रेजर अन् पोरेल बाद झाले तरी अजून पंत होता. त्यामुळं हैदराबादचं टेन्शन कमी झालं नव्हतं. पंतनेही 35 चेंडूत 44 धावा धावा ठोकत फाईट दिली होती. मात्र टी नटराजननं एकाच षटकात अशी काही वातावरण टाईट केलं की दिल्लीचा संघ 6 बाद 199 वरून थेट 10 बाद 199 धावा असा रसातळाला गेला. पंतनं संथ फलंदाज केली म्हणून गळा काढला जातोय. मात्र नटराजननं चांगला मारा केला म्हणून कोण कौतुक करताना दिसत नाही.
टी नंटराजननं 19 व्या ओव्हरमध्ये शुन्य धावा देत 3 विकेट्स घेतल्या. ज्या सामन्यात 465 धावा झाल्यात त्या सामन्यात या पठ्ठ्यानं मेडन ओव्हर टाकली. नटाराजननं आपल्या 4 षटकात फक्त 4.80 च्या इकॉनॉमीनं 19 धावा देत 4 फलंदाज गार केले.
तिकडं दिल्लीकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवनं देखील आपला आंतरराष्ट्रीय दर्जा दाखवून दिला. त्यानं देखील हैदराबादनं 6 षटकात 125 धावा चोपल्यानंतर हैदराबादला धक्क्यावर धक्के दिले होते. त्यानं देखील 4 षटकात 4 विकेट्स घेतल्या. बाकी हेडनं बॉलरची मानगुट कशी मुरगळली अन् त्याला सामनावीर ठरवून कसं बक्षीस दिलं हे तुम्हाला माहीत असेलच!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.