नवी दिल्ली : इम्पॅक्ट प्लेअर ही संकल्पना आपल्याला पसंत नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूचे महत्त्व कमी झाले आहे, अशी नाराजी भारतीय कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली. गत आयपीएलपासून इम्पॅक्ट प्लेअरचा अवलंब करण्यात आला.
मुळात क्रिकेट हा ११ खेळाडूंचा खेळ आहे. त्यामुळे १२ खेळाडू खेळणे हे आपल्याला मान्य नाही. क्रिकेट हा खेळ प्रेक्षकांसाठी अधिक मनोरंजक होण्यासाठी विविध प्रयोग केले जातात; परंतु त्या वेळी क्रिकेटचा मूळ पाया कायम राहणे आवश्यक आहे. इम्पॅक्ट खेळाडूच्या या नियमामुळे शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर यांचा गोलंदाज म्हणून वापर केला जात नाही. हे भारतीय क्रिकेटच्या भवितव्यासाठी योग्य नाही, असे स्पष्ट मत रोहित शर्माने मांडले.
१ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची निवड केली जाणार आहे, त्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माचे इम्पॅक्ट खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू यांच्याबाबतचे हे मत महत्त्वाचे आहे.
शिवम दुबे हा मुळात अष्टपैलू खेळाडू आहे; परंतु इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमामुळे त्याचा गोलंदाज म्हणून वापर केला जात नाही. येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्याची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करण्याचा विचार झाला, तर त्याच्या गोलंदाजीची चाचणीच झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.