IPL 2024 Shashank Singh sakal
IPL

IPL 2024 Shashank Singh : ‘नकोसा’ असलेला झाला मॅचविनर ; पंजाबला सामना जिंकून देणाऱ्या शशांक सिंगची अजब कहाणी

सर्वसाधारणपणे दोनशे धावांचे आव्हान पार करणे कठीणच असते, पण पंजाब संघाने गुरुवारी झालेल्या गुजरातविरुद्धच्या सामन्यात ते शशांक सिंगच्या जोरावर शक्य केले.

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : सर्वसाधारणपणे दोनशे धावांचे आव्हान पार करणे कठीणच असते, पण पंजाब संघाने गुरुवारी झालेल्या गुजरातविरुद्धच्या सामन्यात ते शशांक सिंगच्या जोरावर शक्य केले. २९ चेंडूंत नाबाद ६१ धावांची खेळी साकार करणारा शशांक खरे तर पंजाब संघासाठी लिलावात ‘नकोसा’ होता; परंतु आता तो त्यांच्यासाठी मॅचविनर झाला. आयपीएल चाहत्यांना शशांक सिंग हा कदाचित नवा चेहरा वाटत असेल, पण हा मुंबईचा खेळाडू देशांतर्गत असो वा आयपीएल सर्वत्र संचार असलेला खेळाडू आहे. पाच वर्षांपासून तो आयपीएलमध्ये आहे.

गुजरातविरुद्धच्या सामन्यात शशांक सिंग फलंदाजीस उतरला तेव्हा पंजाबची अवस्था ४ बाद ७० अशी होती आणि आवश्यक धावांची सरासरी ११.४७ इतकी झाली होती. पंजाबच्या विजयाची शक्यता त्यावेळी ४.७७ टक्के इतकी कमी झाली होती; परंतु शशांक सिंगने चमत्कार करावा अशी घणाघाती फलंदाजी करताना त्याने उमेश यादव, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद अशा आंतरराष्ट्रीय गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली. पण हाच शशांक पंजाबसाठी कदाचित जबरदस्तीने किंवा चुकीने संघात घ्यावा लागला होता.

लिलावात काय घडले होते...

१९ डिसेंबरला झालेल्या लिलावात शशांक सिंगचे नाव आले आणि पंजाबने त्याच्यासाठी हात वरती केला. हा खेळाडू आपल्याला नको आहे किंवा चुकीची आपण बोली सुरू केली याची जाणीव झाली, पण या दरम्यान लिलावकर्ती मलिका सागर यांनी हाताडो मारून बोली पूर्ण केली. आपल्याला या शशांकसाठी बोली लावायची नव्हती, असे पंजाब संघाच्या टेबलवरील व्यक्ती सांगत होत्या, पण बोली पूर्ण झाल्यामुळे काहीच करता आले नाही. त्यानंतर सारवासारव करताना आपण याच शशांकसाठी बोली लावल्याचे पंजाब संघ व्यवस्थानाकडून जाहीर करण्यात आले होते.

या शशांकची ही पहिली आयपीएल नाही. तो २०१७ पासून कोणत्या ना कोणत्या संघाासोबत आहे. २०१७ मध्ये दिल्ली संघाने आपल्या संघात घेतले होते. त्यानंतर २०१९ आणि २०२० मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघासोबत होता. २०२१ च्या लिलावात तो अनसोल्ड राहिला. २०२२ मध्ये हैदराबाद संघाने त्याला आपल्या संघात घेतले आणि आपल्या पदार्पणाच्या सामन्यात लॉकी फर्ग्युसनला सलग दोन षटकार ठोकत सहा चेंडूतं नाबाद २५ धावांचा झंझावात सादर केला होता. पण त्यानंतर विशेष कामगिरी न करू शकल्यामुळे हैदराबाद संघाने रिलीज केले होते.

मूळचा मुंबईकर खेळाडू

शशांक हा मूळचा मुंबईतील खेळाडू आहे. सलामीचा फलंदाज आणि ऑफस्पिनर अशी गुणवत्ता असलेला शशांक वयोगटातील स्पर्धेत त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१५ मध्ये मुश्ताक अली राष्ट्रीय ट्वेन्टी-२० स्पर्धेत तो मुंबईकडून खेळला. एकूण १५ ट्वेन्टी-२० आणि तीन ‘अ’ श्रेणीचे सामने खेळल्यानंतर त्याला मुंबई संघात स्थान मिळणे कठीण झाले. त्यामुळे त्याने आपले जन्मगाव असलेल्या छत्तीसगडची वाट धरली.

मुंबईलाच हरविले

२०१९-२० मध्ये छत्तीसगडने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेत मुंबईचा धक्कादायक पराभव केला. त्यात छत्तीसगडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शशांकने निर्णायक कामगिरी केली होती.

कालिचरण, प्रॉक्टर यांच्या विक्रमाशी बरोबरी

प्रथम श्रेणीच्या एकाच सामन्यात १५० हून अधिक धावा आणि पाच विकेट अशी कामगिरी करणारा शशांक पहिला भारतीय ठरला आणि त्याने वेस्ट इंडीजच्या ऑल्विन कालिचरण, आफ्रिकेच्या माईक प्रॉक्टर यांच्याशी बरोबरी केली. ही कामगिरी त्याने २०२३ मध्ये मणिपूरविरुद्ध केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT