IPL 2023 CSK 
IPL

IPL 2023 CSK: धोनीच्या CSK वर बंदी येणार?, तामिळनाडू विधानसभेत गदारोळ! काय आहे प्रकरण?

Sandip Kapde

एकीकडे धोनीची टीम CSK आयपीएल मध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. तर दुसरीकडे तामिळनाडू विधानसभेत आयपीएल क्रिकेट संघाचा मुद्दा तापला आहे. मंगळवारी पीएमकेच्या आमदाराने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला आणि CSK वर बंदी घालण्याची मागणी केली. संघात तामिळ खेळाडू नसल्याने सीएसकेवर बंदी घालण्यात यावी, असा युक्तिवाद त्यांनी केला. 

विधानसभेत खेळावरील अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान, धर्मपुरीचे पीएमके आमदार व्यंकटेश्वरन यांनी सीएसकेवर बंदी घालण्याची मागणी उपस्थित करून सदस्यांना धक्का दिला. चेन्नई सुपर किंग्ज हे तामिळनाडूचे असले तरी तामिळ तरुणांना महत्त्व दिले जात नाही आणि तामिळनाडूचे खेळाडू या संघात नाहीत, असे वेंकटेशन यांनी म्हटले आहे. 

व्यंकटेश्वरन म्हणाले, "तामिळनाडूमध्ये अनेक क्रीडापटू आहेत. तामिळनाडूची राजधानी चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर आहे. तरी देखील संघात एकही खेळाडू नसणे हे दुर्दैवी आहे. मी फक्त विधानसभेत हा मुद्दा मांडला आहे. या विषयावर मंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिलेले नाहीत. मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री कारवाई करतील, याची मला खात्री आहे. तामिळनाडूत तमिळ लोकांना महत्त्व दिले नाही तर ते इतरत्र कुठेही मिळणार नाही. 

आयपीएल सामन्याच्या तिकिटावरून वाद -

याशिवाय AIADMK आमदाराने IPL सामन्यासाठी पास मागितला होता, त्यावरून वाद निर्माण झाला होता. एसपी वेलुमणी म्हणाले, जेव्हा राज्यात AIADMK सरकार होते तेव्हा त्यांना मॅच पास देण्यात आले होते. सध्याच्या सरकारला ४०० क्रिकेट पास मिळाले, पण अण्णाद्रमुकच्या आमदारांना एकही पास देण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT