Tim David IPL 1000th Match MI vs RR ESAKAL
IPL

Tim David MI vs RR : 6, 6, 6, ... अन् टीम डेव्हिडने कॅप्टन रोहितला दिले 150 व्या सामन्यात विजयाचे गोड गिफ्ट

अनिरुद्ध संकपाळ

IPL 1000th Match MI vs RR : मुंबई इंडियन्सच्या टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव आणि कॅमरून ग्रीन यांनी आपल्या कर्णधाराला एकदम ढासू बर्थडे गिफ्ट दिले. मुंबईने राजस्थानचे 213 धावांचे आव्हान 6 फलंदाज आणि 3 चेंडू राखून पार केले. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 17 धावांची गरज होती. त्यावेळी टीम डेव्हिडने जेसन होल्डरला सलग तीन षटकार मारत विजयश्री खेचून आणला. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून आज रोहित शर्मा आपला 150 वा सामना खेळत होता. याचबरोबर हा ऐतिहासिक असा 1000 वा आयपीएल सामना देखील होता. आजचा सामना जिंकून मुंबईने 8 गुणांसह 7 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

मुंबई इंडियन्ससमोर राजस्थानने विजयासाठी 213 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात म्हणावी तशी आक्रमक झाली नाही. संदीप शर्माने बर्थडे बॉय रोहित शर्माचा अवघ्या 3 धावांवर त्रिफळा उडवला होता.

मात्र इशान किशन आणि कॅमरून ग्रीन यांनी डाव सावरत भागीदारी रचली. या दोघांनी संघाला जवळपास 10 च्या रनरेटने धावा करत 76 धावांपर्यंत पोहचवले. मात्र अश्विनने इशान किशनची 28 धावांवर शिकार केली. किशन बाद झाल्यावर ग्रीनने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत तुफान फटकेबाजी करत 26 चेंडूत 44 धावा चोपल्या. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे मुंबईने 10 षटकातच शंभरी पार केली होती.

आर अश्विनने ग्रीनचे अर्धशतक होऊ दिले नाही. त्याने त्याला 44 धावांवर बाद करत मुंबईला तिसरा धक्का दिला होता. मात्र सूर्यकुमार यादव सेट झाला होता. त्याने ग्रीनने सेट केलेली धावगती कायम ठेवली. तो 189 च्या स्ट्राईक रेटने 29 चेंडूत 55 धावांची खेळी करत मुंबईला 15 व्या षटकापर्यंत 150 च्या पार घेऊन गेला. मात्र मोक्याच्या वेळी बोल्टने त्याची विकेट घेत राजस्थानला पुन्हा सामन्यात आणले.

सूर्या बाद झाल्यानंतर टीम डेव्हिडवर सामना संपवण्याची जबाबदारी आली होती. त्याच्या जोडीला तिलक वर्मा होता. मात्र तिलकची सुरूवात संथ झाली. दुसऱ्या बाजूने टीम डेव्हिड हाणामारी करत होता. अखेर तिलकला देखील सूर गवसला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. तरी देखील सामना 6 चेंडूत 17 धावा असा राजस्थानच्या पारड्यात होता.

मात्र इरेला पेटलेल्या टीम डेव्हिडने जेनस होल्डरच्या पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार ठोकत सामना जिंकून दिला. टीम डेव्हिडने 14 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. तर तिलक वर्माने 21 चेंडूत नाबाद 29 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली.

तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर विजयासाठी 213 धावांचा मोठे आव्हान ठेवले. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवाल मुंबईच्या गोलंदाजांना एकटा भिडला. त्याने 62 चेंडूत तडाखेबाज 124 धावा ठोकल्या. यशस्वीचे हे आयपीएलमधील पहिलेच शतक आहे. यात त्याने 16 चौकार आणि 8 षटकार लगावले. राजस्थानकडून जैसवालनंतर जॉस बटलरने सर्वाधिक 18 धावा केल्या. मुंबईकडून अर्शद खानने 3 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT