IPL Toss Fixing mi vs kkr IPL 2024 news sakal
IPL

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

IPL 2024 Toss Fixing MI vs KKR : आयपीएल 2024 चा 51 वा सामना शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.

Kiran Mahanavar

IPL 2024 Toss Fixing MI vs KKR : आयपीएल 2024 चा 51 वा सामना शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चांगली कामगिरी करत केकेआर संघाने हंगामातील सातवा विजय संपादन केला.

केकेआरने दिलेल्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संपूर्ण संघ 18.5 षटकांत 145 धावांत गारद झाला. आणि कोलकाता संघाने 24 धावांनी शानदार विजय मिळवला. पण या सामन्यादरम्यान पुन्हा एकदा टॉस चर्चेत आला. नाणेफेकीच्या वेळी टॉस कॅमेऱ्यात न दाखवल्याने लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

खरंतर सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस उंच हवेत फेकला, त्यानंतर श्रेयस अय्यरने हेड मागितले परंतु मॅच रेफरी म्हणाला की टेल. आणि हार्दिकने नाणेफेक जिंकली.

मात्र, टॉसपर्यंत कॅमेरा पोहोचण्याआधीच मॅच रेफरीने निर्णय दिला, जे पाहून लोकांना टॉस फिक्सिंगचा संशय आला. आयपीएलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लोकांनी हे आरोप केले आहेत.

याआधी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यातही असाच प्रकार पाहायला मिळाला, जेव्हा सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी टॉस पलटवून मुंबईला नाणेफेक जिंकायला लावल्याचा आरोप करण्यात आला. तेव्हा त्या सामन्याच्या नाणेफेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या डोक्यावरून टॉस लांब फेकला जो त्याच्या मागे पडला. त्या सामन्यात रेफ्री जवागल श्रीनाथ टॉस उचलण्यासाठी मागे गेले. इतकेच नाही तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी श्रीनाथवर टॉस फिक्स केल्याचा आरोपही केला.

त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर बेंगळुरूचा हैदराबादशी सामना झाला, तेव्हा नाणेफेकदरम्यान फॅफ डू प्लेसिस पॅट कमिन्सला सांगत होता की मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान रेफ्री जवागल श्रीनाथ यांनी नाणेफेकवेळी टॉस उचलला आणि तो फिरवला. तो हातवारे करत हे कसे झाले सांगत होता. आणि कमिन्सही आश्चर्याने त्याचे बोलणे ऐकत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT