Tuljapur Bourn Rajvardhan Hangargekar brought by Chennai Super Kings in IPL 2022 Auction  esakal
IPL

IPL 2022 Auction: तुळजापूरचा राजवर्धन धोनीच्या तालमीत होणार तयार

अनिरुद्ध संकपाळ

बंगळुरू : आयपीएल लिलावच्या (IPL 2022 Auction) दुसऱ्या दिवशी 19 वर्षाखालील भारतीय संघातील चार खेळाडूंवर सर्वांचे लक्ष होते. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरच्या हट्टाकट्टा राजवर्धन हंगरगेकरचाही (Rajvardhan Hangargekar) समावेश होता. ज्यावेळी राजवर्धनचे नाव लिलावासाठी पुकारण्यात आले त्यावेळी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये (Chennai Super Kings) त्याला आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ निर्माण झाली. मात्र अखेर महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारत 30 लाख बेस प्राईस असलेल्या राजवर्धनसाठी 1.5 कोटी रूपये खर्च केले.

भारताने नुकाताच विक्रमी पाचव्यांदा 19 वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला. या संघातील दमदार कामगिरी करणाऱ्या चार खेळाडूंनी यंदाच्या आयपीएल लिलावात उतरले होते. त्यातील राज बावाला (Raj Bawa) सर्वाधिक 2 कोटीची बोली लागली. तर महाराष्ट्राच्या राजवर्धन हंगरगेकरनेही कोटीचा आकडा पार केले. त्याला सीएसकेने 1.5 कोटी रूपयांची बोली लावून आपल्या संघात सामावून घेतले.

राजवर्धन हंगरगेकर हा वेगवान गोलंदाज आणि आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. त्याने 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये अनेक सामन्यात स्लॉग ओव्हरमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली होती. याचबरोबर तो वेगाने गोलंदाजी करणे पसंत करतो. आता ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) पाठोपाठ तोही चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळणार आहे.

सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीच्या सानिध्यात आलेल्या ऋतुराज गायकवाडचा कायापालट झाला आहे. आता राजवर्धन हंगरगेकरकडेही अशीच धोनीच्या मुशीत तयार होण्याची संधी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT