Umran Malik Will Break Shoaib Akhtar Fastest Ball World Record ESAKAL
IPL

उमरान मलिकच मोडणार शोएब अख्तरचं रेकॉर्ड; माजी खेळाडूला विश्वास

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : सनराईजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज दिवसेंदिवस वेगवान गोलंदाजी करण्याचे आपलेच रेकॉर्ड प्रत्येक सामन्यागणिक मोडत आहे. उमरान मलिकच्या (Umran Malik) या वेगवान गोलंदाजीची स्तुती जगभरातील दिग्गज करत आहेत. शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) मात्र त्याला एक तिरकस सल्ला दिला होता. माझं वेगावान गोलंदाजीचं रेकॉर्ड (Fastest Ball World Record) मोडण्याच्या नादात स्वतःची हाडं मोडून घेतली नाही म्हणजे मिळवलं असं तो म्हणाला होता. दरम्यान, भारताचा माजी खेळाडू परवेज रसूल (Parvez Rasool) याने उमरान मलिकची पाठराखण केली. तो म्हणाला की, जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) या वेगवान गोलंदाजाकडे पाकिस्तानचा स्पीडस्टार शेएब मलिकचे सर्वात वेगावान चेंडू टाकण्याचे रकॉर्ड मोडण्याची क्षमता आहे.

सनराईजर्स हैदराबाच्या उमरान मलिकने आयपीएलच्या 15 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या 5 मे रोजी झालेल्या सामन्यात 157 किमी प्रतीतास वेगाने चेंडू फेकला होता. हा चेंडू 20 व्या षटकात टाकला होता. दरम्यानस रसूल म्हणाला की उमरान मलिकला लवकरात लवकर भारतीय संघात स्थान दिले पाहिजे.

'ज्या प्रकारे उमारन मलिक आयपीएलमध्ये गोलंदाजी करत आहे. मला असे वाटते की तो शोएब अख्तरचे सर्वात वेगवान गोलंदाजीचे रेकॉर्ड लवकरच तोडले. उमरान मलिककडे जबरदस्त गुणवत्ता आहे. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. हा भारतीय क्रिकेटसाठी एक चांगला संकेत आहे. अशा प्रकारचे गुणवत्तापूर्ण खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत ही दिलासादायक बाब आहे.'

रसूल पुढे म्हणाला की, 'मला असे वाटते की तो 17 वर्षाखालील आणि 19 वर्षाखालील ज्यूनियर क्रिकेट स्पर्धेत फारसा खेळलेला नाही. तो सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे. सर्वजण त्याच्याबद्दल बोलत आहेत म्हणजे त्याच्याकडे विशेष गुणवत्ता असणार. तो आयपीएलमध्ये दमदार करत आहे. मला असे वाटते की तो भारताकडून देखील चांगली कामगिरी करेल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT