Varun Chakaravarthy SRH vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव करत बदला घेतला. सनराईजर्स हैदराबादने केकेआरच्या त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला होता. आता या पराभवाचे उट्टे केकेआरने काढले.
केकेआरच्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकात 8 बाद 166 धावांपर्यंतच मजल मारता आली. केकेआरकडून शेवटचे षटका टाकणाऱ्या वरूण चक्रवर्तीने 9 धावा सेव्ह करताना षटकात देत 1 विकेट घेत फक्त 3 धावा दिल्या. याचबरोबर शार्दुल ठाकूरने देखील 3 षटकात 23 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. हैदराबादकडून कर्णधार माक्ररमने सर्वाधिक 41 धावा केल्या.
केकेआरचे 172 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादची केकेआरच्या गोलंदाजांपुढे अवस्था 4 बाद 54 धावा अशी झाली होती. अभिषेक शर्मा, मयांक अग्रवाल, राहुल त्रिपाठी अन् हॅरी ब्रुक ही तगडी टॉप ऑर्डर पॉवर प्लेमध्येच पॅव्हेलियनमध्ये पोहचली. हैदराबाद हा सामना मोठ्या फरकाने हरणार असे वाटत असतानाच कर्णधार एडिन माक्ररमने झुंजार फलंदाजीचे प्रदर्शन केले.
त्याने हेन्री क्लासेनला साथीला घेत 5 व्या विकेटसाठी 70 धावांची दमदार भागीदारी रचत सामना जिवंत ठेवला. मात्र ही जोडी जोडी ब्रेकर शार्दुल ठाकूरने फोडली अन् केकेआरने सामन्यावर पकड निर्माण करण्यास सुरूवात केली. माक्ररम आणि अब्दुल समद यांनी हैदराबादला 150 च्या जावळ पोहवले खरे मात्र वैभव अरोराने माक्ररमला 41 धावांवर बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला.
समादने या धक्क्यातून हैदराबादला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला. हैदराबादला शेवटच्या षटकात विजयासाठी फक्त 9 धावांची गरज होती. नितीश राणासमोर शेवटचे षटक टाकण्यासाठी तीन पर्याय होते. शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा आणि वरूण चक्रवर्ती! नितीश राणाने अनेकांचा सल्ला घेतला मात्र शेवटी फिरकीपटू वरूण चक्रवर्तीवर विश्वास ठेवला.
चक्रवर्तीनेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत पहिल्या दोन चेंडूत 2 धावा दिल्या. त्यानंतर अब्दुल समादला 21 धावांवर बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. आता तीन चेंडूत 7 धावांची गरज होती. या तीन चेंडूत फक्त 1 धाव देत वरूण चक्रवर्तीने केकेआरला 5 धावांनी सामना जिंकून दिला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने सनराईजर्स हैदराबादसमोर विजयासाठी 172 धावांचे आव्हान ठेवले. केकेआरकडून रिंकू सिंहने 46 धावांची तर कर्णधार नितीश राणाने 42 धावांची खेळी केली. मात्र केकेआरच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. हैदराबादकडून मार्को जेनसेन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. यांना भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, एडिन माक्ररम आणि मार्कंडेय यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.