Virat Kohli Royal Challengers Bangalore Defeat SHR : सनराईजर्स हैदराबादच्या हेन्रिच क्लासेनने शतकी खेळी करत आरसीबसमोर 187 धावांचे मोठे आव्हान ठेवले. मात्र क्लासेनच्या या शतकाला विराट कोहलीने देखील शतकी उत्तर दिले. विराट कोहलीने 63 चेंडूत शतक ठोकले. या शतकी जोरावर आरसीबीने हैदराबादचे 187 धावांचे आव्हान 19.2 षटकात दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. आरसीबीकडून फाफ ड्युप्लेसिसने 71 धावांची खेळी केली. या दोघांनी 172 धावांची दमदार सलामी दिली.
विराट कोहलीने यंदाच्या हंगामातील आपले पहिले शतक ठोकले. हे त्याचे आयपीएल इतिहालातील सहावे शतक ठरले. याचबरोबर त्याने ख्रिस गेलच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराटने आज आयपीएलमधील अर्धशतकांचे अर्धशतक देखील पूर्ण केले.
गुणतालिकेचा विचार केला तर आरसीबीने आजचा सामना जिंकून आपली गुणसंख्या 14 केली आहे. त्यांनी गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले असून मुंबई इंडियन्सला पाचव्या स्थानावर ढकलले. आरसीबीला आपले प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी गुजरात टायटन्सविरूद्धचा सामना जिंकावा लागणार आहे.
सनराईजर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेले 187 धावांचे आव्हान पार करताना आरसीबीची सलामी जोडी विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी तडाखेबाज सुरूवात केली. त्यांनी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत 6 षटकात नाबाद 65 धावा ठोकल्या. विराट कोहलीने चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करत दमदार सुरूवात केली. त्यानंतर फाफ ड्युप्लेसिसने आपला गिअर बदलला.
फाफ ड्युप्लेसिसने विराटच्या मागू येत 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ विराट कोहलीने देखील 35 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर विराट - फाफच्या जोडीने शतकी भागीदारी देखील पूर्ण केली. मात्र आता आरसीबीला धावगती वाढवण्याची गरज होती. स्ट्राईक रेटवरून टीका होणाऱ्या विराटने याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने 12 व्या षटकातनंतर तुफान फटकेबाजी करत बघता बघता आरसीबीला दीडशतकी मजल मारून दिली. हैदराबादला आरसीबीची सलामी जोडीच फोडण्यात यश येत नव्हते.
आता सामना 15 चेंडूत 20 धावा असा असताना षटकार मारत विराटे आपले शतक पूर्ण केले. विराट कोहलीने आजच्या सामन्यात आयपीएलमधील आपले सहावे शतक ठोकले. मात्र पुढच्याच चेंडूवर विराट कोहली 63 चेंडूत शतक ठोकून बाद झाला. विराटच्या षटकारामुळे सामना 12 चेंडूत 15 धावा असा आला होता.
दुसऱ्या बाजूने 45 चेंडूत नाबाद 67 धावांवर खेळणाऱ्या फाफ ड्युप्लेसिसने टी नटराजनला चौकार मारत सामना 10 चेंडूत 10 धावा असा आणला. मात्र तो पुढच्याच चेंडूवर 71 धावांवर बाद झाला. नटराजनने सामना 7 चेंडूत 7 धावा असा आणला होता. मात्र मॅक्सवेलने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत सामना 6 चेंडू 3 धावा असा आणला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.