आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यांमध्ये राजस्थानने RCB चा 7 गडी राखून पराभव केला. 2008 नंतर दुसऱ्यांदा राजस्थानने आयपीएल फायनल मध्ये प्रवेश केला आहे. क्वालिफायर 2 मध्ये विराट कोहली परत एकदा स्वस्तात बाद झाला. कोहलीच्या बॅटमधून या हंगामात फक्त दोनचं अर्धशतके केली आहे. विराट कोहली त्याच्या कितीही खराब फॉर्म मध्ये असला तरी त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये कधीही कमी होत नाही. असंच कालच्या सामन्यात पाहिला मिळालं.
राजस्थानविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोहली क्रिजवर फलंदाजी करत असताना एका चाहत्याने सुरक्षा कवच तोडत मैदानातं आला. मैदानात पोहोचून कोहलीशी जबरदस्तीने हस्तांदोलन करण्यास सुरुवात केली. तो आनंदाने उडी मारत आणि उत्साहाने प्रतिक्रिया देऊ लागला. यानंतर सुरक्षा रक्षक आले आणि त्या व्यक्तीला मैदानातून बाहेर काढले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
लखनऊविरुद्धच्या सामन्यादरम्यानही हा व्यक्ती मैदानात आला होता. मात्र कोलकात्याच्या सुरक्षा रक्षकाने वेळीच खांद्यावर उचलून मैदानाबाहेर काढले. पण अहमदाबादमध्ये असे होऊ शकले नाही आणि चाहत्यालाही त्याचा हिरो कोहलीला भेटण्याची संधी मिळाली. त्याचा मैदानावर सेलिब्रेशन करतानाच व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. चाहत्यांची ही इच्छा पूर्ण झाली असली तर सामन्यादरम्यानची सुरक्षा पूर्णपणे बरोबर नव्हती हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान पार करताना हंगामातील आपले चौथे शतक ठोकत राजस्थानला फायनलमध्ये पोहचवले. राजस्थानने बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान 18.1 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. बटलरने 60 चेंडूत 106 धावा ठोकल्या. राजस्थानने सामना 7 विकेट राखून जिंकत आयपीएल 2022 ची फायनल गाठली. आता राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रविवारी फायनल सामना होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.