Virat Kohli News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा सध्या 17 वा हंगाम सुरू आहे. आयपीएलदरम्यान बऱ्याचदा संघांचे वेगवेगळे प्रमोशनल इव्हेंट्स होत असतात. नुकताच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचाही एक कार्यक्रम झाला.
यासाठी विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि फाफ डू प्लेसिस उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान विराटने एक गमतीशीर कमेंट केली आहे.
या कार्यक्रमात निवेदक असलेल्या गौरव कपूरने विराटला विचारले की सामन्यानंतरचे तुला काय खायला आवडते (guilty pleasure snack)? त्यावर विराटने गमतीने उत्तर दिल की काहीही खाऊ शकतो त्यात कुठलीच अपराधीपणाची भावना नसते.
त्यानंतर तो सिराजकडे इशारा करत याबाबत फलंदाज आणि गोलंदाजांच्या फरकही सांगतो. त्याने सांगतो की गोलंदाजांना सामन्यात निर्धारित षटके टाकायची असतात, त्यामुळे त्यांना काहीही खाताना त्याचा विचार करावा लागतो. मात्र फलंदाजांसाठी सामना अवघ्या एका चेंडूनंतरही संपू शकतो.
त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता की पहिल्याच चेंडूवर जर फलंदाज बाद झाला, तर त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाव्यतिरिक्त फार काही करण्यासाठी नसते, तेही जर संघाची दुसरी गोलंदाजी असेल तर.
या क्षणांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट म्हणाला, 'हा विषय वेगवान गोलंदाजांचा आहे. आमचा सामना तर 1 चेंडूंमध्येही संपू शकतो. त्यामुळे आम्हाला हा विचार करावा लागतो की खायचे की नाही.'
'पण गोलंदाजांसाठी हे अगदी सोपे आहे, त्यांना माहित असते की त्यांना 24 चेंडू टाकण्यासाठी धावायचेच आहे.' दरम्यान विराटने ज्या गमतीशीर पद्धतीने हे उत्तर दिले, ते ऐकून सर्वच हसायला लागले.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की विराट हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्यामुळे तो त्याच्या आहाराबाबत जागरुक असतो. त्यामुळे बऱ्याचदा त्याला याबद्दल प्रश्न विचारले जातात.
विराट सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2024 मध्ये त्याने 500 धावांचा टप्पाही पूर्ण केला आहे. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 7 व्यांदा हंगामात 500 धावा पूर्ण केल्या आहेत.
त्याने आयपीएल 2024 मध्ये 10 सामन्यांत 71.43 च्या सरासरीने 147 च्या स्ट्राईक रेटने 500 धावा केल्या आहेत. त्याने या हंगामात 1 शतक आणि 4 अर्धशतके केली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.