Virat Kohli IPL 2023 esakal
IPL

Virat Kohli IPL 2023 : विराट कोहलीने इतिहास रचला! दणदणीत फॉलोअर्ससह ठरला आशियातील पहिला खेळाडू

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli IPL 2023 : भारताचा धडाकेबाज फलंदाजी विराट कोहलीने आयपीएलचा हंगाम तुफान गाजवला. त्याने सलग दोन शतकी खेळींसह सहा अर्धशतके ठोकत तब्बल 639 धावा ठोकल्या. विराटचा संघ जरी प्ले ऑफ गाठू शकला नसला तरी त्याने आपल्या दमदार कामगिरीने संघाला अनेक विजय मिळवून दिले. विराट आता क्रिकेटच्या मैदानावर आपल्या जुन्या फॉर्ममध्ये आला आहे. त्याने हाच आपला दमदार फॉर्म इन्स्टाग्रामवर देखील दाखवला.

आयपीएल 2023 मध्ये धोनी पाठोपाठ विराट कोहलीला देखील प्रेक्षकांमधून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण स्टेडियम विराट.. विराट... चा जयघोष करत होते. आता इन्स्टाग्रामवही त्याच्या फॅन फॉलोईंगमध्ये तुफान वाढ झाली आहे. विराट कोहलीने 250 मिलियन फॉलोअर्सचा (25 कोटी) टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे इतकी भीमकाय इन्स्टा फॅन फॉलोईंग असरणारा विराट कोहली हा आशियातील पहिला खेळाडू ठरला आहे.

विराट कोहलीने इन्स्टा फॅन फॉलोईंगमध्ये भारतीय क्रिकेट जगतातील धोनी आणि तेंडुलकर यांच्यासारखी मोठी नावे मागे टाकली आहेत. भारताचा मास्टर ब्लास्टरचे 40.4 मिलियन इन्स्टा फॉलोअर्स आहेत. तर महेंद्रसिंह धोनीचे 42.5 मिलियन इन्स्टा फॉलोअर्स आहेत. विराट कोहली आशियातील सर्वात फॅन फॉलोईंग असलेल्या खेळाडूंच्या यादीत सर्वोच्च स्थानावर आहे.

जागतिक क्रीडा विश्वाचा विचार केला तर इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॅन फॉलोईंग असणाऱ्या खेळाडूंमध्ये फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा आघाडीवर आहे. त्याचे इन्स्टावर 585 मिलियन फॅन फॉलोईंग आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर लिओनेल मेस्सीचा नंबर लागतो. त्याचे 463 मिलियन फॅन फॉलोईंग आहेत.

सध्याच्या घडीला विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 1 हजार 601 पोस्ट झाल्या आहेत. विराट कोहली हा जवळपास 278 लोकांना इन्स्टाग्रावर फॉल करतोय. यात सचिन तेंडुलकर, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचा समावेश आहे.

दरम्यान, आयपीएलच्या 16 व्या हंगामात आरसीबीने लीग स्टेजमध्येच गाशा गुंडाळल्यानंतर आता विराट कोहलीने WTC final वर लक्ष केंद्रित केले आहे. तो कालच लंडनमध्ये पोहचला असून त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यासाठी कंबर कसली आहे. विराट कोहलीचा आयपीएलमधील फॉर्म पाहिला तर WTC final मध्ये त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT