wankhede stadium ms dhoni bat well mi lost match 20 runs mi vs csk ipl 2024 Sakal
IPL

MI vs CSK : वानखेडेवर पुन्हा धोनी महात्म्य; चेन्नईचा विजयात दुबे-ऋतुराज, पथिरानाही चमकले, रोहितचे शतक व्यर्थ

षटकार ठोकून भारताला २०११ मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर आपल्या षटकारांचा जलवा दाखवला, त्यामुळे दोनशे पार धावा करणाऱ्या चेन्नईने आयपीएल सामन्यात मुंबईचा २० धावांनी पराभव केला.

शैलेश नागवेकर : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : षटकार ठोकून भारताला २०११ मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर आपल्या षटकारांचा जलवा दाखवला, त्यामुळे दोनशे पार धावा करणाऱ्या चेन्नईने आयपीएल सामन्यात मुंबईचा २० धावांनी पराभव केला. मुंबईच्या रोहित शर्माने नाबाद शतक केले; पण इतरांची साथ त्याला मिळाली नाही.

आपला २५०वा आयपीएल सामना खेळत असलेला धोनी अखेरचे चार चेंडू असताना मैदानात आला आणि सलग तीन षटकारांसह त्याने ५००च्या स्ट्राईक रेटने नाबाद २० धावा केल्या. हार्दिक पंड्याच्या या अखेरच्या षटकांत २६ धावा फटकावण्यात आल्या त्याच मुंबईच्या मुळावर आल्या.

त्या अगोदर ऋतुराज गायकवाड (६९) आणि शिवम दुबे (६६) यांची टोलेबाजी चेन्नईचा डाव भक्कम करणारी होती. काही दिवसांपूर्वी बंगळूरविरुद्ध १९६ धावांचे आव्हान पार करणाऱ्या मुंबईसाठी २०७ धावांचे लक्ष्य कठीण नव्हते; पण त्यांच्या मार्गात पथिराना आला २८ धावांत चार विकेट मिळवून त्याने चेन्नईचा विजय सोपा केला.

द्विशतकी धावांचा पाठलाग करण्यासाठी पॉवर प्लेच्या सहा षटकांत किमान १० धावांची सरासरी आवश्यक असते. रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीवीरांनी ६३ धावा फटकावल्या. सात षटकांत ७० अशी आश्वासक वाटचाल होत असताना मलिंगाप्रमाणे तिरकस शैली असलेला पथिराना गोलंदाजीस आला आणि त्याने तीन चेंडूत इशान व सूर्यकुमार यांना बाद केले. सूर्यातर शून्यावर बाद झाला.

एक बाजू सांभाळत अर्धशतक करणाऱ्या रोहित शर्माने नंतर तिलक वर्मासह डाव सावरत मुंबईचे आव्हान कायम ठेवले होते; परंतु पथिराना आपल्या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीस आला आणि त्याने तिलक वर्माला बादच केले नाही तर मुंबईच्या डावाला ब्रेक लावला.

तिलक बाद झाल्यानंतर पुढच्या १० चेंडूत अवघ्या चार धावाच मुंबईला करता आल्या आणि त्यात हार्दिकचीही विकेट गमावली, त्यामुळे २४ चेंडूंत ७२ धावांची गरज असे समीकरण तयार झाले. तेथूनच मुंबईचा संघ पाठीमागे पडला.

चेन्नई संघ व्यवस्थापनाने आज सलामीच्या जोडीत बदल केला. कर्णधार ऋतुराज गायकवाडऐवजी अजिंक्य रहाणेला सलामीला पाठवले. डावाच्या पहिल्या षटकात मोहम्मद नबीला याने चौकार मारून आक्रमकता दाखवली खरी; परंतु त्या पुढे तो जाऊ शकला नाही. कोएत्झीच्या एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर तो बाद झाला.

चेन्नईचा दुसरा सलामीवीर राचिन रवींद्र यालाही पॉवर प्लेचा फायदा घेता येत नव्हता; परंतु रहाणे बाद झाल्यावर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ऋतुराजच्या पवित्र्यामुळे चेन्नईच्या धावगतीत चांगली प्रगती व्हायला लागली. कोएत्झीच्या दुसऱ्या षटकात त्याने दोन चौकार आणि एका षटकारासह १४ धावा वसूल केल्या. त्यामुळे पॉवर प्लेच्या सहा षटकांत चेन्नईच्या धावफलकावर ४८ धावा झळकल्या होत्या.

राचिन रवींद्र १६ चेंडूत २१ धावा करून बाद झाला असला, तरी चेन्नईने १० षटकांत दोन बाद ८० धावांपर्यंत मजल मारली होती. हे १०वे षटक हार्दिक पंड्याने टाकले आणि त्यात शिवम दुबेने तीन चौकारांसह १५ धावा फटकावल्या. या १० षटकांत जसप्रीत बुमाराने दोन षटकांत केवळ १० धावा दिल्या होत्या.

चेन्नईसाठी हुकमाचा एक्का ठरत असलेल्या दुबेने डावाच्या उत्तरार्धात सफाईदारपणे टोलेबाजी केली. रोमारिओ शेफर्डच्या एका षटकांत तब्बल २२ धावा फटकावण्यात आल्या. यात ऋतुराज गायकवाडने आपले अर्धशतक ३३ चेंडूत पूर्ण केले; तर ही अर्धशतकी मजल दुबेने २८ चेंडूत पूर्ण केली. या दोघांनी ४५ चेंडूत ९० धावांची भागीदारी करुन चेन्नईच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.

धोनीची टोलेबाजी

अखेरचे चार चेंडू असताना मैदानात आलेल्या धोनीने ६, ६, ६, २ अशी टोलेबाजी केली. त्यामुळे या षटकांत हार्दिकने सर्वाधिक २६ धावा दिल्या.

संक्षिप्त धावफलक

चेन्नई : २० षटकांत २० षटकांत ४ बाद २०६ (ऋतुराज गायकवाड ६९ - ४० चेंडू, ५ चौकार, ५ षटकार, शिवम दुबे नाबाद ६६ - ३८ चेंडू, १० चौकार, २ षटकार, महेंद्रसिंग धोनी नाबाद २० - ४ चेंडू, ३ षटकार, कोएत्झी ४-०-३५-१, श्रेयस गोपाल १-०-९-१, हार्दिक पंड्या ३-०-४३-२) विजयी वि. मुंबई इंडियन्स २० षटकांत ६ बाद १८६ धावा (रोहित शर्मा नाबाद १०५ - ६३ चेंडू, ११ चौकार, ५ षटकार, एम. पथिराना ४/२८).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT