Wayne Parnell RR vs RCB esakal
IPL

Wayne Parnell RR vs RCB : राजस्थानचा खेळ अवघ्या 10 षटकात खल्लास! आरसीबीने आरआरला 59 धावात गुंडाळले

अनिरुद्ध संकपाळ

Wayne Parnell RR vs RCB : रॉयल चॅलेंजर बेंगलोगच्या 172 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स झुंजार खेळ खरेल अशी अपेक्षा होती. मात्र डावाच्या पहिल्या षटकापासूनच राजस्थानच्या फलंदाजीला ग्रहण लागले. हे ग्रहण अखेर 10 व्या षटकात 112 धावांच्या पराभवानंतरच सुटले. आरसीबीच्या गोलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी करत राजस्थानचा संपूर्ण संघ 59 धावात पॅव्हेलियनमध्ये धाडला. आरसीबीकडून वेन पार्नेलने सर्वाधिक 3 बळी टिपले. त्याला ब्रेसवेल, कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी 2 विकेट घेत चांगली साथ दिली. राजस्थानकडून हेटमायरने 19 चेंडूत 35 धावा केल्या.

राजस्थानचा 112 धावांनी दारूण पराभव झाल्याने त्यांचे आयपीएल 2023 मध्ये प्ले ऑफ गाठण्याचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले आहे. आरसीबीने आता राजस्थानची जागा घेतली आहे. 12 सामन्यात 6 विजय मिळवत 12 गुणांसह आरसीबी आता 5 व्या तर राजस्थान सहाव्या स्थनावर पोहचली आहे. आरसीबीने आपले नेट रनरेट देखील प्लेसमध्ये(+0.166) नेले. राजस्थानचा आता एकच सामना शिल्लक असून तो जरी जिंकला तरी त्यांचे 14 गुण होणार आहेत.

आरसीबीने 172 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर राजस्थान हे आव्हान पार करण्यासाठी मैदानावर उतरला. मात्र डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का बसला. त्यांचा स्टार सलामीवीर यशस्वी जैसवालला मोहम्मद सिराजने शुन्यावर बाद केले. यानंतर पुढच्याच षटकात वेन पार्नेलने जॉस बटलरला देखील शुन्यावरच बाद करत राजस्थानचे दोन्ही धडाकेबाज सलामीवीर माघारी धाडले. या धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच संघाचा कर्णधार संजू सॅमसन पार्नेलच्या याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर 4 धावांवर बाद झाला.

पहिल्या दोन षटकातच तीन फलंदाज बाद झाल्यानंतर जो रूट आणि देवदत्त पडिक्कल यांनी राजस्थानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेसवेलने पडिक्कलला 4 धावांवर तर वेन पार्नेलने जो रूटला 10 धावांवर बाद केले. यानंतर ब्रेसवेलने ध्रुव जुरेलला बाद करत राजस्थानची अवस्था 7 षटकात 6 बाद 31 धावा अशी केली.

यानंतर हेटमायरने काही आक्रमक फटके मारत राजस्थानला अर्धशतक पूर्ण करून दिले. मात्र त्याला साथ देणारा आर. अश्विन एक चोरटी धाव घेण्याच्या नादात शुन्यावर बाद झाला. यानंतर हेटमायरची देखील 19 चेंडूत 35 धावांचे केलेली झुंजार खेळी संपुष्टात आली. अखेर आरसीबीने राजस्थानचा संपूर्ण संघ 10 . 3 षटकात 59 धावात पॅव्हेलियनमध्ये धाडला. आरसीबीने 112 धावांनी सामना जिंकत आपले प्ले ऑफची आशा जिवंत ठेवली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT