IPL

Who is Sameer Rizvi : 8.4 कोटी...! अवघ्या वयाच्या 20 व्या वर्षी समीरला CSK ने बनवले करोडपती

Kiran Mahanavar

Who is Sameer Rizvi Sold to Chennai Super Kings News : उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या युवा अनकॅप्ड समीर रिझवीवर आयपीएलमध्ये पैशांचा पाऊस पडला. त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने तब्बल 8.40 कोटी रुपये खर्च करून आपल्या ताफ्यात घेतले.

चेन्नई संघाने 20 वर्षीय समीरवर मोठा डाव खेळला आहे. समीर गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत होता, त्याचेच फळ त्याला या लिलावात मिळाले. समीरची मूळ किंमत फक्त 20 लाख रुपये होती.

उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या समीर रिझवीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 2 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 11 लिस्ट-ए आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश टी-20 लीगमध्ये समीरची बॅट जोरात बोलली. या स्पर्धेत कानपूर सुपरस्टार्सकडून खेळताना समीरने 10 सामन्यांमध्ये 50.56 च्या सरासरीने आणि 188.8 च्या लाइटनिंग स्ट्राइक रेटने 455 धावा केल्या.

UP टी-20 लीगमध्ये समीर सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू होता. समीरने या स्पर्धेत 2 शतके झळकावली होती. याशिवाय त्याने अर्धशतकही झळकावले. समीरने या स्पर्धेत अतिशय आक्रमक शैली दाखवली होती. समीर षटकार आणि चौकार मारण्यात माहीर आहे. यूपी लीगच्या 10 सामन्यांमध्ये समीरने 38 चौकार आणि 35 षटकार मारले होते.

यानंतर नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही समीरने चमक दाखवली. देशांतर्गत टी-20 स्पर्धेत समीर सर्वाधिक धावा करणारा 13वा खेळाडू होता. समीरने 7 सामन्यांच्या 7 डावात 69.25 च्या सरासरीने आणि 139.90 च्या स्ट्राईक रेटने 277 धावा केल्या होत्या. या काळात त्याच्या बॅटमधून 18 चौकार आणि 18 षटकार मारले गेले.

समीरने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, 9 डावात फलंदाजी करत त्याने 49.16 च्या सरासरीने आणि 134.70 च्या स्ट्राइक रेटने 295 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगेंची तुलना मोहम्मद अली जिनांशी; नितेश राणे यांचं वादग्रस्त विधान, EWS आरक्षणावरुन टिपण्णी

Thane News : मर्जिया पठाण यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती

Sakshi Malik: बजरंग, विनेश यांच्यामुळे कुस्ती आंदोलनाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला; साक्षी मलिकची टीका

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाचेच; सुप्रिया सुळे यांचा दावा

इस्रायली सैनिकांना दवाखान्याखाली सापडला खजाना! दहशतवादी संघटनेचं गुप्त खंदक, रोकड अन् सोनं...

SCROLL FOR NEXT