दोन खेळाडूंचे सेम नाव... बेस प्राइस पण सेम.... आणि हीच गोष्ट आयपीएल 2024 च्या लिलावात प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्ज संघासाठी डोकेदुखी ठरली. या लिलावादरम्यान पंजाब किंग्सने एका खेळाडूला खरेदी केले ज्याला त्यांना खरेदी करायचे नव्हते. शशांक सिंग असे या खेळाडूचे नाव आहे. जो पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे.
पंजाब किंग्सने अष्टपैलू शशांक सिंगला 20 लाख रुपयांची मूळ किंमत देऊन खरेदी केले. ज्याचे वय 32 वर्षे आहे. पण फ्रँचायझीला 19 वर्षीय शशांक सिंगला घ्यायचे होते. या गोंधळाचे कारण म्हणजे दोन्ही खेळाडूंच्या नावासोबतच त्यांची मूळ किंमतही सारखीच होती.
यावेळी प्रशिक्षक संजय बांगर आणि ट्रेव्हर बेलिस यांच्यासह, संघ मालक नेस वाडिया आणि प्रीती झिंटा पंजाबच्या लिलावाच्या टेबलवर होते. जेव्हा शशांक सिंगचे नाव लिलावासाठी आले तेव्हा फक्त पंजाब किंग्सने बोली लावली. आणि याच कारणास्तव हा खेळाडू केवळ 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत त्यांच्या संघात गेला.
त्यानंतर लिलाव करणाऱ्या मल्लिका सागरने बोलीसाठी पुढील खेळाडूचे नाव घेतले. पण त्यानंतर पंजाब किंग्जला त्यांची चूक लक्षात आली. आणि त्याने खेळाडूंना परत करण्याची आणि संघाच्या पर्समध्ये पैसे परत करण्याची मागणी केली, परंतु तसे होऊ शकले नाही. पण तुम्हाला माहिती आहे. त्याचा असा विक्रम आहे तो कोणालाच मोडता आलेला नाही.
शशांक सिंह बद्दल बोलायचे तर, त्याचा जन्म 21 नोव्हेंबर 1991 रोजी झाला. तो यापूर्वी आयपीएलमध्ये पंजाब आणि हैदराबाद संघाचा भाग होता. मात्र, त्याला पंजाबकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. गेल्या मोसमात त्याने सनरायझर्स हैदराबादकडून 10 आयपीएल सामने खेळले. ज्यामध्ये त्याच्या नावावर 17.25 च्या सरासरीने केवळ 69 धावा होत्या. (Who is Shashank Singh?)
पण आपण शशांक सिंहच्या ज्या विक्रमबद्दल बोलत आहे तो म्हणजे, विजय हजारे ट्रॉफी 2023 मधला आहे. छत्तीसगड आणि मणिपूर सामना होता. पण त्या विजयात मोलाचा वाटा होता छत्तीसगडचा अष्टपैलू खेळाडू शशांक सिंगचा. त्याने त्या सामन्यात 150 धावा करत पाच विकेट्स घेतल्या. प्रथम श्रेणीमध्ये ही कामगिरी करणार तो पहिला भारतीय ठरला. आणि त्याच्या संघाने मणिपूरवर 88 धावांनी विजय मिळवला.
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टन, रिले रौसो, जितेश शर्मा, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, ऋषी धवन, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरान, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, शिवम , हरप्रीत भाटिया, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंग, प्रिन्स चौधरी, तनय त्यागराज आणि विद्वथ कवेरप्पा. (Punjab Kings Squad for IPL 2024)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.