why KKR April 17 clash against RR likely to get rescheduled Marathi News sakal
IPL

लोकसभा निवडणूक नाही तर 'या' कारणामुळे पुन्हा बदलणार IPL 2024 चे शेड्यूल?

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : आता सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीग 2024 चा थरार सुरू आहे, आणि दरम्यान लोकसभा निवडणुका पण होणार आहेत.

Kiran Mahanavar

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : आता सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीग 2024 चा थरार सुरू आहे, आणि दरम्यान लोकसभा निवडणुका पण होणार आहेत. पण आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे सामनेही भारताच होणार आहेत. आणि या दुसऱ्या टप्पाच्या शेड्यूलची पण घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील 17 एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्याच्या शेड्यूलमध्ये बदल करू शकते. या संदर्भात, दोन्ही फ्रँचायझी, राज्य संघटना आणि ब्रॉडकास्टर यांना संकेत देण्यात आले आहेत.

रामनवमीमुळे केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात बदल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. हा वार्षिक उत्सव देशभरातील लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात. त्यामुळे या दिवशी सामन्याला पुरेशी सुरक्षा देण्याबाबत प्रशासन संभ्रमात आहे. या महिन्यापासून देशात लोकसभा निवडणुकीला सुरुवात होत असून या सर्व बाबी लक्षात घेऊन बीसीसीआयने सामना पुढे ढकलण्याचा पर्यायही ठेवला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, BCCI आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) कोलकाता पोलिसांच्या सतत संपर्कात आहेत. या प्रकरणी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, परंतु बीसीसीआयने संभाव्य बदलांबाबत फ्रँचायझी आणि ब्रॉडकास्टर या दोघांनाही संकेत दिल्याचे सांगण्यात येत आहे.(why KKR April 17 clash against RR likely to get rescheduled )

बीसीसीआयने आयपीएलच्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक दोन टप्प्यात केले. सुरुवातीला मंडळाने या स्पर्धेतील 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आणि लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित 53 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रक तयार करताना बीसीसीआयने होम अवे फॉरमॅटला कोणत्याही परिस्थितीत कोणतीही अडचण येऊ नये याची पूर्ण काळजी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल यूएईमध्ये होऊ शकते, असे मानले जात होते, परंतु बीसीसीआयने हे सर्व अंदाज फेटाळून लावले होते. मात्र, आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यात केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामना पुन्हा नियोजित करावा लागेल. आयपीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस प्रशासनाशी चर्चा सुरू असून लवकरच याबाबत निर्णय घेऊ.

आयपीएलच्या चालू हंगामात केकेआर आणि राजस्थान संघांची सुरुवात चांगली झाली आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी दोन सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. राजस्थानचा तिसरा सामना आज वानखेडेवर मुंबई इंडियन्सशी आहे, तर बुधवारी केकेआरचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT