IPL 2024 Punjab vs Delhi Playing 11 Marathi News sakal
IPL

IPL 2024 PBKS vs DC : सर्वांच्या नजरा पंतच्या खेळीवर... कोण ठरणार कोणावर भारी... किती वाजता रंगणार थरार?

IPL 2024 Punjab vs Delhi Playing 11 News : दिल्ली कॅपिटल्स-पंजाब किंग्स आज आमने-सामने

Kiran Mahanavar

IPL 2024 Punjab vs Delhi Playing 11 News : आयपीएलमध्ये आज सामना होणार आहे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात; परंतु सामन्याचा निकाल आणि त्यात योगदान देणाऱ्या खेळाडूंपेक्षा रिषभ पंतची तंदुरुस्ती, चपळता, लवचिकता आणि त्याची फटकेबाजी याकडेच सर्वांचे लक्ष असणार आहे.

दिल्ली आणि पंजाब दोन्ही संघांना गतवर्षी अपेक्षा पूर्ण करता आल्या नव्हत्या. आता काही नवीन खेळाडू संघात आल्यामुळे आणि नवी रचना झाल्यामुळे यंदा अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी दोन्ही संघ सलामीलाच जोरदार खेळ करण्याची संधी सोडणार नाहीत. असे एकीकडे चित्र असले तरी दुसरीकडे दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत सामन्यात केंद्रबिंदू असेल.

डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातातून वाचलेला रिषभ पंत कमालीची मेहनत घेऊन क्रिकेटच्या मैदानावर परतत आहे. या अपघातात त्याला झालेल्या इतर दुखापती बऱ्या झाल्या; परंतु गुडघ्याची दुखापत कधीही बरी होणार नाही अशी शक्यता होती; परंतु पंतने त्यावर मात केली. मात्र यष्टीरक्षणात सतत उठबस करावी लागत असल्यामुळे त्याचा गु़डघा किती सक्षम झाला आहे, हे उद्याच्या सामन्यातून कळून येईल. त्यामुळे भारतीय निवड समितीचेही त्याकडे लक्ष असेल.

या आयपीएलमध्ये मुळात पंत खेळेल की नाही अशी शक्यता होती. खेळला तर केवळ फलंदाज म्हणून मैदानात उतरेल, असेही सांगितले जात होते; परंतु राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून त्याला पूर्णपणे हिरवा कंदील दाखवण्यात आला. परिणामी पंत आयपीएलमध्ये नेतृत्वही करणार आहे.

दिल्लीची फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी मजबूत आहे. पंतसोबत डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, पृश्वी शॉ, स्टब्स असे आक्रमक फलंदाज आहेत, तर गोलंदाजीत एन्रिच नॉर्किया, मुकेश कुमार, ईशांत शर्मा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे.

पंजाब किंग्ज संघात मात्तबर संघांना धक्का देण्याची क्षमता आहे; परंतु आयपीएलमध्ये त्यांच्या हाती विजेतेपद लागलेले नाही. २०१४ मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती; परंतु कोलकता संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर २०१९ ते २०२२ या चार वर्षांत सहाव्या स्थानावर राहाणाऱ्या पंजाबची गतवर्षी आठव्या क्रमांकावर घसरण झाली होती.

यंदाही त्यांच्या फलंदाजीची मदार कर्णधार शिखर धवन, जॉनी बेअरस्टॉ आणि जितेश शर्मा यांच्यावर असेल. अष्टपैलू सिकंदर रझा, लिएम लिव्हिंगस्टोन आणि रिषी धवन कशी कामगिरी करतात हे महत्त्वाचे असेल, तर कागिसो रबाडा वेगवान गोलंदाजीत हुकमी एक्का असेल.

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील दुसरा सामना 23 मार्च रोजी महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम चंदीगड येथे खेळला जाईल. सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. त्याचवेळी दुपारी ३ वाजता दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.

दिल्ली ः रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, स्वास्तिक चिकारा, यश धूल, एन्रिच नॉर्किया, ईशांत शर्मा, जे रिचर्डसन, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रसिख दर, विकी ऑस्तवाल, अक्षर पटेल, जाके फ्रेझर, ललित यादव, मिचेल मार्श, सुमीत कुमार, अभिषेक पॉरेल कुमार कुशाग्र, रिकी भुई, शेय होप आणि त्रिस्तन स्टब्स.

पंजाब ः शिखर धवन (कर्णधार), जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टॉ, प्रभसिरमन सिंग, लिएम लिव्हिंगस्टोन, हरप्रीत भाटिया, रिले रॉसो, शशांक सिंग, ख्रिस वोक्स, विश्वप्रताप सिंग, अशुतोष शर्मा, तनय त्यागराजन, अर्थव तायडे, रिषी धवन, सॅम करन, सिकंदर रझा, शिवम सिंग, प्रिन्स चौधरी, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, राहूत चहर, हर्षल पटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT